IND vs BAN: बिहारच्या 'या' लालचा बांगलादेशत गदर! द्विशतक झळकावत दिग्गजांच्या यादीत सामील

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक झळकावत शानदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशानचा जन्म 18 जुलै 1998 रोजी पाटणा (बिहार) येथे झाला. ईशानने पटनाच्या मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली.

ईशान किशनचा जलवा

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशानने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ईशानने 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दरम्यान, ईशान किशनचा स्ट्राइक रेट 160.31 राहिला आहे. ईशानच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतके झळकावली आहेत.

Ishan Kishan
IND vs BAN: तिसऱ्या ODI सामन्यात हिटमॅनच्या जागी कोण येणार सलामीला?

विश्वविक्रम मोडून इतिहास रचला

ईशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम गेलच्या नावावर होता, मात्र आता ईशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी

  • रोहित शर्मा - 264

  • मार्टिन गुप्टिल - 237*

  • वीरेंद्र सेहवाग - 219

  • ख्रिस गेल - 215

  • फखर जमान - 210*

Ishan Kishan
IND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा आधार बनणार 'चायनामन'
  • ईशान किशन - 210

  • रोहित शर्मा - 209

  • रोहित शर्मा - 208*

  • सचिन तेंडुलकर - 200*

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com