आयएसएल 2020: आगामी मोसमासाठी एफसी गोवाचा सराव सुरू

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

आय़सीएल शिष्टाचानुसार संघातील नवा खेळाडू ईशान पंडिता तसेच लेन डौंगेल हे खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत बाकी खेळाडू सराव शिबिरात सहभागी झालेत. कोरोना विषाणू महामारीमुळे खेळाडूंसाठी यंदा ऑफसीझन लांबला. त्यामुळे त्यांच्या तंदरूस्तीवर शिबिरात जास्त भर देण्यात आला आहे. ​

पणजी- एफसी गोवा फूटबॉल संघाने 2020-21च्या मोसमापूर्वीच्या सरावाला आरंभ केला आहे. गतवर्षी इंडियन सुपर लीग स्पर्धेची विनर्स शील्ड जिंकलेला संघ यंदा एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही खेळेल. 

आय़सीएल शिष्टाचानुसार संघातील नवा खेळाडू ईशान पंडिता तसेच लेन डौंगेल हे खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत बाकी खेळाडू सराव शिबिरात सहभागी झालेत. कोरोना विषाणू महामारीमुळे खेळाडूंसाठी यंदा ऑफसीझन लांबला. त्यामुळे त्यांच्या तंदरूस्तीवर शिबिरात जास्त भर देण्यात आला आहे. त्यादृष्टीने चेंडूवरील हुकमत राखण्यासाठी मैदानावरील प्रशिक्षण आणि शारीरिक सक्षमतेसाठी व्यायामशाळेतील सत्र यास महत्व देण्यात आले आहे. 

मोसमपूर्व सराव शिबिराविषयी एफसी गोवाचा अनुभवी मध्यमरक्षक लेनी रॉड्रिग्ज याने सांगितले की, हा खूपच लांबलेला ऑफसीझन आहे, जो खरोखरच आमच्यासाठी खडतर आहे. आता आम्ही परत मैदानावर आलो असून आम्हाला जे आवडते ते सुरू केले आहे. मी खरोखरच आनंदित आहे. गेल्या काही महिन्यांत युद्धपातळीवर काम केलेल्या योद्धय़ांना लेनीने सलाम केला असून त्यांच्यामुळे आम्ही आज मैदानावर आहोत, असे त्याने सांगितले. 

 दरम्यान, एफसी गोवाचे स्पॅनिश  प्रशिक्षक रूहान फेरॅऩ्डो अजून गोव्यात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने एलाजुने  गोवे येथील मैदानावर शिबारास सुरूवात केली आहे. आणखी काही दिवसांनी संघाचे शिबिर साल्वादोर द मुंद येथील मैदानावर हलविण्यात येणार आहे. फेरॅन्डो त्यांच्या संपर्कात राहतील आणि त्यांना सराव सत्राची माहिती पुरवतील.     

संबंधित बातम्या