'इंडियन सुपर लीग'चे वेळापत्रक जाहीर; यांच्यात होणार पहिला सामना....

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

इंडियन सुपर लीगच्या ७ व्या हंगामासाठी एटीके मोहन बागान विरूद्ध केरळ ब्लास्टर्स यांच्यात पहिली लढत होणार आहे. पुढील महिन्याच्या २० नोव्हेंबरला या स्पर्धेचा हा उद्घाटनाचा सामना बांभोळीच्या जीएमसी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.    

 मुंबई- हिरो इंडियन सुपर लीग २०२०-२१ च्या हंगामासाठी पहिल्या 11 फेऱ्यांतील सामन्यांची घोषणा आज करण्यात आली. फूटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड ने ही घोषणा केली असून २० नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फक्त एकाच फेरीची घोषणा झाली असून उर्वरीत फेऱ्यांचे वेळापत्रक काही दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहे. सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे.    

इंडियन सुपर लीगच्या ७ व्या हंगामासाठी एटीके मोहन बागान विरूद्ध केरळ ब्लास्टर्स यांच्यात पहिली लढत होणार आहे. पुढील महिन्याच्या २० नोव्हेंबरला या स्पर्धेचा हा उद्घाटनाचा सामना बांभोळीच्या जीएमसी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.      
या हंगामापासून इंडियन सुपर लीगमध्ये नव्याने सामील झालेला संघ 'एससी ईस्ट बंगाल' स्पर्धेतील सर्वांत जुना संघ कोलकात्याशी आपली पदार्पणाची लढत खेळणार आहे. 'आयएसएल'मध्ये पहिल्यांदाच एससी ईस्ट बंगाल आणि एटीके मोहन बागान हे समोरासमोर लढताना बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी टिळक मैदानावर त्यांच्यातील ही लढत खेळवली जाणार आहे.   

मागील वर्षी एटीके ने अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. एटीकेच्या संघाचे आईलीग चॅम्पियन मोहन बागान यांच्या सोबत सुत जुळले असून आता ते एक क्लब म्हणून खेळणार आहेत. कोलकात्याचे संघ एससी मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यात 27 नोव्हेंबरला वास्को येथे पहिला सामना खेळवला जाणार  आहे. या स्पर्धेत एफसी गोवा आपला पहिला सामना बंगळूर एफसी विरूद्ध २२ नोव्हेंबरला खेळणार आहे.   

 

संबंधित बातम्या