आयएसएल २०२०: 'एफसी गोवा'च्या आघाडीफळीत देवेंद्र मुरगावकर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

२१ वर्षीय स्ट्रायकर देवेंद्र मुरगावकर तीन वर्षांसाठी इंडियन सुपर लीग (आयएसएल) विनर्स शिल्ड विजेत्या संघात गुरुवारी दाखल झाला.

पणजी- गोव्याचा गुणवान युवा आघाडीपटू देवेंद्र मुरगावकर आगामी हंगामात एफसी गोवाकडून खेळणार आहे. २१ वर्षीय स्ट्रायकर तीन वर्षांसाठी इंडियन सुपर लीग (आयएसएल) विनर्स शिल्ड विजेत्या संघात गुरुवारी दाखल झाला. 

देवेंद्र हा साळगावकर एफसीकडून आतापर्यंत खेळत होता. देवेंद्रसाठी एफसी गोवाने ट्रान्सफर शुल्क दिले आहे, मात्र याची नक्की रक्कम किती आहे हे जाहीर करण्यात आलेले  नाही.

संबंधित बातम्या