ISL :एफसी गोवाचा लेनीस निरोप

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याला एफसी गोवा संघाने निरोप दिला आहे. 2018 पासून तो गोव्यातील संघातर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळला.

पणजी: अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याला एफसी गोवा संघाने निरोप दिला आहे. 2018 पासून तो गोव्यातील संघातर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळला. आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील पहिल्या टप्प्यानंतर एफसी गोवाने 33 वर्षीय लेनी मुक्त केले आहे. या संघाशी त्याचा करार 2022 पर्यंत होता. एफसी गोवाच्या जर्सीत लेनी 51 आयएसएल सामने खेळला. अडीच मोसमात त्याने त्याने दोन गोल व एका असिस्टची नोंद केली. आयएसएल स्पर्धेत लेनी एकूण 97 सामने खेळला असून त्याने चार गोल व दोन असिस्ट नोंदविले आहेत.

ISL: बंगळूरला ईस्ट बंगालचा धोका

यंदाच्या मोसमात लेनी एफसी गोवातर्फे 10 सामन्यांत 739 मिनिटे खेळला. तो संघात असताना एफसी गोवाने 2019 साली सुपर कप जिंकला. गतमोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता. लेनीने क्लबसाठी दिलेल्या योगदानाबद्दल एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने त्याचे आभार मानले असून भविष्यातील कारकिर्दीसाठी सुयश चिंतिले आहे.

 

आयएसएल स्पर्धेत लेनी...

- पुणे सिटी एफसी (2014, 2015, 2016) : 29 सामने, 1 गोल

- बंगळूर एफसी (2017-18) : 17 सामने, 1 गोल, 1 असिस्ट

- एफसी गोवा (2018-19, 2019-20, 2020-21) : 51 सामने, 2 गोल, 1 असिस्ट

संबंधित बातम्या