ISL Football : दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात संधी दवडल्याने नुकसान

गोवा, नॉर्थईस्टला बरोबरीचे समाधान
ISL Football : दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात संधी दवडल्याने नुकसान
ISL footballDainik Gomantak

पणजी : सामन्याच्या भरपाई वेळेत स्पॅनिश खेळाडू आयरान काब्रेरा याने समोर केवळ गोलरक्षक असताना संधी साधली असती, तर एफसी गोवास इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात आणखी एक विजय शक्य झाला असता, पण अखेरीस त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 1-1 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना शुक्रवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.

स्पॅनिश खेळाडू हर्नान सांताना याने थेट फ्रीकिकवर नॉर्थईस्ट युनायटेडला दुसऱ्याच मिनिटास आघाडी मिळवून दिल्यानंतर 39 व्या मिनिटास एफसी गोवाचा (goa) स्पॅनिश आघाडीपटू आयरान काब्रेरा याने बरोबरीचा गोल केला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. एफसी गोवाची ही 11 लढतीतील चौथी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे 13 गुण झाले.

ISL football
IND vs SA: 'तुम्ही कधीच तरुणांचा आदर्श होऊ शकत नाही!

समान गुण झाल्यानंतर गोलसरासरीत एफसी गोवा (-4) आठव्या स्थानी आला, तर ओडिशा एफसीला (-7) नवव्या स्थानी घसरावे लागले. नॉर्थईस्ट युनायटेडने 11 लढतीत तिसरी बरोबरी नोंदविली. त्यामुळे त्यांचे 9 गुणांसह ते दहाव्या स्थानी कायम राहिले. पूर्वार्धात गोलबरोबरीनंतर एफसी गोवाने उत्तरार्धात आक्रमणावर लक्ष केंद्रित केले, पण नेमबाजीत भेदकतेच्या अभावामुळे त्यांना आघाडीपासून दूरा राहावे लागले.

एफसी गोवाने संघात बदल केले. मागील सामन्यात क्लीन शीट राखलेल्या गोलरक्षक नवीन कुमार याच्या जागी धीरज सिंगने पुनरागमन केले. एदू बेदियाच्या जागी कर्णधाराचा आर्मबँड ग्लॅन मार्टिन्सला मिळाला, तर आयरान काब्रेरा याने स्टार्ट लिस्टमध्ये स्थान मिळविले.

सांतानामुळे आघाडी, काब्रेराकडून बरोबरी

सामन्याच्या सुरवातीस एफसी गोवास चूक महागात पडली. त्यामुळे त्यांना पिछाडीवर जावे लागले. एफसी गोवाच्या लिअँडर डिकुन्हा याने चुकीच्या पद्धतीने हर्नान सांताना याला टॅकल केले, त्यामुळे रेफरीने डिकुन्हाला यलो कार्ड दाखविले, तर नॉर्थईस्टला फ्रीकिक फटका मिळाला. सांताना याने स्वतः हा फटका अचूकपणे मारत गुवाहाटीच्या संघाला आघाडी मिळवून दिली. गोलरक्षक धीरज सेटपिसवर कमजोर ठरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

ISL football
एटीके मोहन बागानची लढत बंगळूरशी, दोन्ही संघ पाच सामने अपराजित

सांतानाचा थेट फटका गोलपट्टीस आपटून नेटमध्ये घुसला. विश्रांतीला सहा मिनिटे असताना एफसी गोवाने सेटपिसवर बरोबरी साधली. आल्बर्टो नोगेरा याच्या कॉर्नर फटक्यावर आयरान काब्रेरा याने प्रेक्षणीय हेडिंग साधले. यावेळी चेंडू नॉर्थईस्टच्या बचावपटूस, तसेच गोलरक्षक मिर्शाद मिचू यांना अडविता आला नाही.

गोल अवैध, एफसी गोवाची आघाडी हुकली

सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना रेफरीने गोल नाकारला, त्यामुळे एफसी गोवाची आघाडी हुकली. होर्गे ओर्तिझ याच्या फ्रीकिक फटक्यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचू याने उडी घेत फटका रोखला. यावेळी चेंडू आयरान काब्रेरा याच्याकडे गेला. काब्रेराचा फटका नॉर्थईस्टच्या बचावपटूने गोलरेषेवर अडविला असता, चेंडूवर ताबा मिळवत एफसी गोवाच्या खेळाडूने चेंडू नेटमध्ये मारला, यावेळी गोलरक्षकाला अडथळा आणल्याच्या कारणास्तव रेफरी आर. व्यंकटेश याने गोल अवैध ठरविला व गुवाहाटीचा संघ बचावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.