आयएसएल लढतींस प्रेक्षक उपस्थितीची आशा

किशोर पेटकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

कोविड-१९ वर उपाय काढल्यास फुटबॉलप्रेमी स्टेडियमवर : आजगावकर

पणजी

कोविड-१९ वर उपाय काढल्यास इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील सामन्यांस प्रेक्षक उपस्थित राहण्याची आशा गोव्याचे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी व्यक्त केली आहे.

आयएसएल स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी रविवारी यंदाच्या स्पर्धेच्या केंद्राची घोषणा केली. त्यानुसार गोव्यातील तीन मैदानावर मिळून २०२०-२१ मोसमातील एकूण ९५ सामने होतील. कोरोना विषाणू महामारीमुळे आरोग्यसंरक्षक उपाययोजनांच्या कारणास्तव सर्व सामने बंद दरवाज्याआड रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्याचे अंबानी यांनी जाहीर केले आहे. स्पर्धा नोव्हेंबरपासून खेळली जाणार असून सर्व संघांचा सराव ऑक्टोबरपासून सुरू होणे नियोजित आहे. स्पर्धा मार्चपर्यंत खेळली जाईलत्यामुळे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत साऱ्या संघांना जैवसुरक्षा वातावरण बंधनकारक असेल. सध्याच्या वेळापत्रकानुसार स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणे नियोजित आहे.

‘‘कोविड-१९ वर आम्ही काही उपाय काढू शकलोतर आम्ही प्रेक्षकांना परवानगी देऊ शकू,’’ असे आजगावकर म्हणाले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमबांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक स्टेडियमवास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर आयएसएल स्पर्धेतील दहा संघांचे सामने खेळले जातील. कोविड-१९ मुळे यंदा स्पर्धा एकाच राज्यात होत आहे. या वर्षी १४ मार्च रोजी फातोर्डा येथे सहाव्या आयएसएल स्पर्धेचा अंतिम सामना रिकाम्या स्टेडियमवर झाला होता.

गोव्यातील आयएसएल स्पर्धेच्या कालावधीत अप्रिय घटना टाळण्यासाठी कोविड-१९ विषयक केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मानक परिचालन पद्धती (एसओपी) आणि उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही क्रीडामंत्री आजगावकर यांनी दिली. स्पर्धेनिमित्त दर्जेदार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध असतील.

 पर्यटन व्यवसाय सावरणार...

कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे. गोव्यात नोव्हेंबरपासून आयएसएल स्पर्धा सुरू होत असल्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायास सावरण्यासाठी मदत होईलअसे आजगावकर यांना वाटते. ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारात पर्यटनमंत्रीही आहेत. आयएसएल स्पर्धेनिमित्त राज्यातील हॉटेलमध्ये सुमारे ५०० खोल्या आरक्षित करण्यात आल्याची माहिती आजगावकर यांनी दिली. ‘‘आम्ही गोव्यात आयएसएल सामन्यांना परवानगी दिली आहे. फुटबॉल हा आमचा राज्य खेळ आहे आणि त्याद्वारे आम्ही पर्यटनास हातभार लावू,’’ असे गोव्याचे पर्यटनमंत्री म्हणाले. आयएसएल स्पर्धेतील १० संघातील खेळाडूसपोर्ट स्टाफअधिकारीस्पर्धा संबंधित अन्य अधिकारीत्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी एफएसडीएल यांच्यातर्फे दीर्घकालावधीसाठी हॉटेल आरक्षित होतील. याठिकाणी स्पर्धा संबंधितांसाठी कडक एसओपी असेल.

 सरावासाठी १० मैदाने

स्पर्धेच्या कालावधीत फातोर्डाबांबोळी आणि वास्को येथील मुख्य स्टेडियम आयएसएल स्पर्धा आयोजकांच्या ताब्यात असतीलत्या अनुषंगाने आयोजकांचा गोवा क्रीडा प्राधिकरण व राज्य प्रशासनासोबत करार असेल. याशिवाय दहा संघांसाठी प्रत्येकी एक सराव मैदानही उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी १० सराव मैदानांचा करार केला जाईल. सरावासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत संबंधित क्लबना मैदान उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहेत्यानिमित्त सध्याच्या साधनसुविधांत नूतनीकरण अपेक्षित आहे. उपलब्ध माहितीनुसारउत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी पाच संघांचे मुख्यालय असेल. त्यामुळे उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यातील मैदानावर प्रत्येकी पाच संघ सराव करतील. हिरवळ असलेल्या मैदानांवरच सहभागी संघ सराव करणार आहेत. सर्व सराव मैदाने स्पर्धा संपेपर्यंत संबंधित क्लबच्या ताब्यात राहतील. सराव मैदान व इतर सुविधांची पाहणी करण्यासाठी आयएसएल संघ सप्टेंबरमध्ये गोव्यात येण्याची शक्यता आहे.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या