आयएसएल राष्ट्रीय स्पर्धेला ग्रासणार?

stadium
stadium

पणजी

कोविड-१९ महामारीमुळे यंदाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा बंद दरवाज्याआड प्रवास टाळत घेण्याबाबत स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) विचार करत आहे. प्रथमदर्शनी गोवा किंवा केरळला प्राधान्य मिळण्याचे संकेत मिळताहेत. आयएसएल गोव्यात झाल्यास अजूनही मुहूर्त शोधणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस ग्रासण्याचे संकेत आहेत.

एफएसडीएलने काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू महामारीबाबत उपाययोजना आणि खबरदारी घेत नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत सातवी आयएसएल स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी गोवाकेरळपश्चिम बंगाल (कोलकाता)तसेच ईशान्येकडील शहरांत स्पर्धा घेण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सध्या गोवा आणि केरळ आयोजनासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सातव्या आयएसएल स्पर्धा केंद्राबाबत लवकरच अधिकृत निर्णय अपेक्षित आहे.

गोव्यात आयएसएल झाल्यास या स्पर्धेमुळे वारंवार लांबणीवर पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस पुन्हा एकदा पुढे ढकलावे लागू शकते. यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली ही स्पर्धा राज्य सरकारने कोविड-१९ महामारी आणि सहभागींच्या आरोग्याचे कारण देत लांबणीवर टाकण्याचे ठरविले आहे. कोरोना विषाणू महामारी परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय स्पर्धेचे भवितव्य ठरविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. यासंदर्भात येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) प्रतिनिधींसमवेत संयुक्त बैठक नियोजित आहे. नोव्हेंबर-मार्च या कालावधीत आयएसएल स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये गोव्यात घ्यायचे झाल्यास राष्ट्रीय स्पर्धेस दोन प्रमुख मैदानांना मुकावे लागू शकते. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमतसेच पर्यायी फुटबॉल केंद्र असलेले बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियम राष्ट्रीय स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीअसे सूत्रांनी सांगितले.

 केरळ शर्यतीतून बाहेर?

प्राप्त वृत्तानुसारकेरळमध्ये आयएसएल होण्याची शक्यता कमी आहे. केरळमध्ये कोचीकोझिकोडतिरुअनंतपुरम येथे फुटबॉल स्टेडियम आहेत. या तिन्ही शहरांत जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. मात्र आयएसएल आयोजकांना प्रवास टाळून स्पर्धा घ्यायची आहे. त्यामुळे केरळमध्ये सातवी आयएसएल स्पर्धा होण्याची शक्यता कमीच मानली जाते. गोव्यात स्पर्धा घेतल्यास प्रवासाचा प्रश्न उद्‍भवणार नाही असे जाणकारांना वाटते. भारतात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने भुवनेश्वरकोलकातागुवाहाटीअहमदाबाद व नवी मुंबई या शहरात होणार असल्याने तेथे आयएसएल स्पर्धा अजिबात शक्य नसेल.

 फातोर्ड्यात मुख्य केंद्र शक्य

आयएसएल स्पर्धा गोव्यातच घेण्याचे ठरल्यासफातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमचा सामन्यांसाठी वापर अपेक्षित आहे. आयएसएल स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. स्पर्धेसाठी नेहरू स्टेडियम मुख्य केंद्र बनवून बांबोळीच्या स्टेडियमचा पर्यायी वापरासंबंधी नियोजन होऊ शकते. तसे झाल्यास ही दोन्ही मैदाने मार्च महिन्यापर्यंत आरक्षित होतील. २०१४ पासून आयएसएल स्पर्धेत एफसी गोवासाठी फातोर्ड्यातील स्टेडियम नियमित मैदान आहेतर बांबोळीतील स्टेडियमचा सरावासाठी वापर होतो. गेली काही वर्षे ही दोन्ही मैदाने एफसी गोवा संघ आयएसएलनिमित्त वापरत आहे. याशिवाय वास्कोतील टिळक मैदानही फुटबॉल सरावासाठी वापरले जाऊ शकते.

संपादन- अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com