ISSF Shooting World Cup: इजिप्तमधून आली मोठी बातमी, 'या' स्टार खेळाडूने जिंकले सुवर्णपदक

Aishwarya Tomar: इजिप्तची राजधानी कैरो येथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत बुधवारी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Aishwarya Tomar
Aishwarya TomarDainik Gomantak

ISSF Shooting World Cup: इजिप्तची राजधानी कैरो येथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत बुधवारी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

स्टार ऑलिम्पियन ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

भारताने या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्णांसह 6 पदके जिंकली आहेत.

त्याचबरोबर, या सुवर्णपदकामुळे पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताला आणखी बळ मिळाले आहे.

दरम्यान, गतवर्षी चांगवोन विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या 22 वर्षीय तोमरने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर श्मिरलचा 16-2 असा पराभव केला होता. तोमरने 406.4 गुणांसह रँकिंग फेरीत दुसरे स्थान पटकावले, तर शमिरेलने 407.9 गुणांसह पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेत भाग घेणारा आणखी एक भारतीय अखिल शेओरान 587 गुणांसह पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला.

Aishwarya Tomar
Women's T20 World Cup: भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धाकड एन्ट्री, आयर्लंडचा उडवला धुव्वा

तसेच, या दोन्ही भारतीय खेळाडूंनी (Indian Players) क्रमवारीत संथ सुरुवात केली. एका क्षणी तोमर सहाव्या तर शेरॉन आठव्या स्थानावर होते. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या खेळात सुधारणा केली. प्रोन पोझिशनवरुन 10 शॉट्स घेतल्यानंतर शेरॉन दुसऱ्या, तर तोमर पाचव्या स्थानावर होता. पण नंतर एक बदल झाला आणि शेरॉन पहिल्यांदा पाचव्या आणि नंतर सातव्या स्थानावर घसरला आणि पदकाच्या दाव्यातून बाहेर पडला.

Aishwarya Tomar
Women's T20 World Cup: स्मृती मानधनाने केले मोठे रेकॉर्ड, पहिल्यांदाच महिला टी-20 मध्ये...

मनू भाकर आणि ईशा सिंग यांनी निराशा केली

तोमरने मात्र दुसरे स्थान पटकावले. तोमर आणि श्मिरेल यांच्यातील सुवर्णपदकाच्या लढतीत सुरुवातीला कडवी झुंज पाहायला मिळाली. एका वेळी 4-4 आणि नंतर 6-6 अशी बरोबरी होती. मात्र यानंतर तोमरने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.

तत्पूर्वी, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या (India) रिदम संगवानने पात्रता फेरीत 589 गुण मिळवून रँकिंग फेरीत स्थान मिळवले आणि क्रमवारीत चौथ्या स्थानावर राहिली. तर हंगेरीच्या वेरोनिका मेजरने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या इतर भारतीय खेळाडूंनी मनू भाकर आणि ईशा सिंग 571 आणि 570 गुणांसह अनुक्रमे 32 व्या आणि 34 व्या स्थानावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com