बुमराह आणि शमी पूर्णपणे तंदुरुस्त रहाणे भारतीय संघासाठी महत्वाचे

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका अतिशय प्रतिष्ठेची ठरणार असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन आपला ‘दारुगोळा’ ताजातवाना ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे कसोटी मालिकेअगोदर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी जसप्रित बुमरा आणि महम्मद शमी यांना आलटून पालटून ठराविक सामन्यात संधी दिली जाण्याची दाट शक्‍यता आहे.

मेलबर्न :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका अतिशय प्रतिष्ठेची ठरणार असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन आपला ‘दारुगोळा’ ताजातवाना ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे कसोटी मालिकेअगोदर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी जसप्रित बुमरा आणि महम्मद शमी यांना आलटून पालटून ठराविक सामन्यात संधी दिली जाण्याची दाट शक्‍यता आहे.क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा एकदिवसीय मालिकेने सुरू होत आहे. २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-२०चे सामने होणार आहेत.

लॉकडाउनमध्ये खेळाडूंना सक्तीचा आराम करावा लागलेला असला तरी जवळपास दोन महिने चाललेल्या आयपीएलमध्ये प्रामुख्याने बुमरा आणि शमी यांनी सातत्याने आपापल्या संघांचा भार वाहिला आहे. बीसीसीआयकडून या प्रमुख गोलंदाजांवरील ताण कमी करावा अशा सुचना देण्यात आल्या तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापन यावर निश्‍चितच विचार करेल. त्यातच ईशांत शर्मा कसोटीसाठी तंदुरुस्त होण्याची शक्‍यता कमी असल्याने बुमरा आणि शमी पूर्णपणे तंदुरुस्त रहाणे भारतीय संघासाठी महत्वाचे आहे. 
बारा दिवसांत सहा सामने

१२ दिवसांत भारताला मर्यादित षटकांचे सहा सामने (तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-२०) खेळायचे आहेत त्यांततर ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पहिला सराव सामना होणार आहे. या कालावधीतच (४, ६ आणि ८ डिसेंबर) सराव सामना असल्याने ट्‌वेन्टी-२० मालिकेत बुमरा-शमी खेळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यानंतर दुसरा सराव सामना ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. 

अधिक वाचा : 

आयएसएलच्या तोंडावर नॉर्थईस्टचे दोन खेळाडू कोरोनाबाधित

संबंधित बातम्या