फिफा विश्वचषकसाठी इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन पात्र

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

2022 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी गतविजेत्य़ा फ्रान्ससह स्पेन, जर्मनी, इटली संघ पात्र ठरले आहेत.

2022 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी गतविजेत्य़ा फ्रान्ससह स्पेन, जर्मनी, इटली संघ पात्र ठरले आहेत. ओस्मान डेम्बेलेने केलेल्या गोलला सर्थी मॅल्यीच्या स्वंयगोलाची साथ लाभल्याने फ्रान्सने कझाकस्तानला 2-0 ने पराजीत केले. तसेच जॉर्जीयावर स्पेनने 2-1 मात करत चौथ्या गटातील अग्रस्थानासह फिफा विश्वचषकामध्ये स्थान मिळवले आहे.

तर दुसरीकडे रोमानियावर जर्मनीने सर्जिओ गनब्रीने नोंदवलेल्या निर्णयाक गोलच्या बळावर 1-0 अशी सरशी साधली. तर पहिल्या गटात आघाडीवर असलेल्या इटलीने बल्गेरियावर 2-0 ने मात केली.

टेनिसचा सम्राट करणार स्वित्झर्लंडची ब्रॅंडिग

फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील शनिवारी पार पडलेल्या सर्बीयाविरुध्दच्या लढतीत ख्रिस्तीयानो रोनाल्डोने शेवटच्या मिनिटाला नोंदवलेला गोल पंचाकडून नाकारण्यात आला;  पण ज्यावेळी रिप्ले पाहण्यात आल्यानंतर हा गोल वैध असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता या पात्रता सामन्यांसाठीही व्हिडिओ साहाय्यक प्रणालीची सुविधा पुरवण्यात येण्याची शक्यत आहे. 

संबंधित बातम्या