भारतात टी -20 वर्ल्डकप खेळणं अवघड; 'घरवापसी' नंतर ऑस्ट्रेलियन दिग्गजाची 'मन की बात'

michel hussy
michel hussy

वर्षाच्या अखेरीस भारतात खेळला जाणारा टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) जवळ येत आहे. त्यामुळे आजी-माजी खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.  नुकतेच, आयपीएल 2021 (IPL 2021) च्या बायो बबलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आढळलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने (Michael Hussey) आपली प्रतिक्रिया दिली आहे. हसी म्हणाला की ''भारतातील कोरोनाची परिस्थती पाहता वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी भारतात जाण्याला इतर संघ तयार नसतील त्यामुळे विश्वचषक युएईमध्ये (UAE) घेण्याचा विचार करावा''. आयपीएलच्या काही संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंदाचा हंगाम स्थगित केला होता. (It's hard to play T20 World in India - Mike Hussey)   

सिडनीला परतल्यानंतर हसीने माध्यमांशी बोलताना सांगितले, "भारतात स्पर्धा खेळणे खूप कठीण जाईल मी आयपीएलच्या आठ संघांबद्दल बोलत आहे आणि टी -20 वर्ल्डकपमध्ये बहुदा आठच संघ असतील. मी आधीच सांगितले आहे की वेगवेगळ्या शहरात खेळण्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढेल''. पुढे माईक हसी म्हणाला “भारताला आपत्कालीन योजना तयार करावी लागेल. कदाचित स्पर्धा युएई किंवा इतरत्र आयोजित केली जाऊ शकते. जगातील अनेक क्रिकेट बोर्ड पुन्हा भारतात स्पर्धा खेळण्यासाठी संघ पाठविण्याविषयी विचार करतील''. युएई हा पर्याय म्हणून उदयास आला असून आयसीसी 1 जून रोजी यासंदर्भात निर्णय घेईल.

हसीने भारतातल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितले की त्याच्यात कोरोनाची लक्षणे होती पण त्याला कधीही भीती वाटली नाही. हसी म्हणाला, ''कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मला वाईट वाटले, परंतू मी घाबरून न जाता त्यासाठी सामोरा गेलो. माझी पहिली चाचणी झाली तेव्हा मला गंभीर लक्षणे नव्हती, मला असे वाटले होते दुसरी चाचणी निगेटिव्ह येईल परंतू दुसरीही पॉझिटिव्ह आली''. पुढे हसी म्हणाला "खरे सांगायचे झाल्यास, मला काही लक्षणे जाणवू लागल्याने मला खात्री झाली की मला कोरोना झाला आहे. मी सामन्या दरम्यान गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीसमवेत बसायचो. त्यामुळे मला कोरोना होण्याची शक्यता होती''. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com