
जगातील सर्वकालीक महान धावपटू म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट (Usain Bolt) आपल्या यशामागे क्रिकेटची (Cricket) मोठी भूमिका मानतो. जमैकाच्या या दिग्गजाने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी क्रिकेट खेळत असल्यामुळे अॅथलेटिक्समध्ये (Athletics) जाऊ शकलो.' एके दिवशी क्रिकेट प्रशिक्षकाने बोल्टला धावण्यातच करिअर करण्याचा सल्ला दिला होता. बोल्टने या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले. बोल्टने 8 ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि 11 जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदके जिंकली आहेत. बोल्टने आतापर्यंत जे यश मिळवले आहे, ते यापुढे कोणी तिथपर्यंत पोहोचेल याची शक्यता कमी आहे.
तेव्हा बोल्टही क्रिकेटच्या प्रेमात पडला
हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिटमध्ये क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांच्याशी झालेल्या संभाषणात बोल्ट म्हणाला, जमैकामधील बहुतेक लोकांना क्रिकेट किंवा फुटबॉल आवडतो.'' बोल्टचे वडील क्रिकेटचे चाहते होते. त्याला पाहून बोल्टही क्रिकेटच्या प्रेमात पडला.
दरम्यान, तो क्रिकेटही खेळायचा. त्याची वेगवान धावगती पाहून एके दिवशी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षकाने त्याला धावण्याचा सल्ला दिला. इथेच बोल्टचे आयुष्य बदलले. तो ट्रॅकवर आला आणि येत्या काही वर्षांत मानवी वेगाशी संबंधित सर्व जागतिक विक्रम त्याने मोडीत काढले.
आपल्या परीक्षेत जगण्याची सर्वात मोठी प्रेरणा
मुलाखतीदरम्यान बोल्टला विचारण्यात आले असता, तो म्हणाला - अनेकांना वाटते की मी कुटुंबासाठी काहीतरी केले पाहिजे. काही लोकांना देशासाठी यश मिळवायचे असते, पण मला स्वतःसाठी काहीतरी करायचे होते. जर मी तंदुरुस्त राहिलो आणि कठोर परिश्रम केले तर मी खूप काही साध्य करु शकतो. हे मला सुरुवातीपासूनच जाणवले. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण यश मिळवू शकू असे विचारले असता, ''बोल्टने अतिशय मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, 2002 मध्ये किंग्स्टनमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर मी घाबरलो होतो. तेव्हा मी फक्त 15 वर्षांचा होतो.''
आवडता क्रिकेटर ब्रायन लारा तर आवडता फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो
मुलाखतीच्या शेवटच्या भागात मेमनने बोल्टला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्याने आपल्या रंजक शैलीत उत्तरेही दिली. बोल्टला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यातील आवडत्या क्रिकेटरची निवड करण्यास सांगितले होते. तेव्हा बोल्ट म्हणाला की, लारा स्वतःच कॅरेबियन स्टार आहे, त्यामुळे तो मला आवडतो. मेस्सी आणि रोनाल्डोमध्ये बोल्टने रोनाल्डोची निवड केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.