जमशेदपूरच्या विजयाचा स्टुअर्ट शिल्पकार

भरपाई वेळेतील पेनल्टी गोल निर्णायक, गतविजेत्या मुंबई सिटीवर मात
Jamshedpur beat eventual winners Mumbai City
Jamshedpur beat eventual winners Mumbai CityDainik Gomantak

पणजी ः रंगतदार ठरलेल्या लढतीत स्टॉकलंडचा आघाडीपटू ग्रेग स्टुअर्ट याच्या भरपाई वेळेतील पेनल्टी गोलमुळे जमशेदपूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football)  स्पर्धेत गतविजेत्या मुंबई सिटीस 3-2 असे निसटते हरविले. बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत स्टुअर्टने एकूण दोन गोल केले.

स्टुअर्टनने नवव्या मिनिटास पहिला गोल केल्यानंतर ऋत्विक दासच्या गोलमुळे जमशेदपूरने तिसाव्या मिनिटास 2-0 अशी आघाडी प्राप्त केली. मुंबई सिटीने उत्तरार्धात मुसंडी मारली. 57व्या मिनिटास राहुल भेकेने त्यांची पिछाडी कमी केल्यानंतर 71 व्या मिनिटास इगोर आंगुलो याचा पेनल्टी फटका जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने अडविला. मात्र 86 व्या मिनिटास बदली खेळाडू ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने पेनल्टी फटक्यावर मुंबई सिटीस 2-2 गोलबरोबरी साधून दिली.

Jamshedpur beat eventual winners Mumbai City
फातोर्ड्यात चौथ्यांदा आयएसएल अंतिम लढत, 20 मार्चला रंगणार सामना

90+3व्या मिनिटास पेनल्टीवर मोसमातील वैयक्तिक नववा गोल करत स्टुअर्टने जमशेदपूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गोलक्षेत्रात मुंबई सिटीच्या विग्नेश दक्षिणमूर्ती याच्या हाताला चेंडू लागल्यानंतर रेफरी हरीश कुंडू यांनी सामन्यात तिसऱ्यांदा पेनल्टी फटक्यासाठी खूण केली.

जमशेदपूरचा हा महत्त्वाचा आठवा विजय ठरला. त्यामुळे 15 लढतीनंतर त्यांचे 28 गुण झाले आणि प्ले-ऑफ फेरीचा दावाही कायम राहिला. पराभवामुळे मुंबई सिटीस धक्का बसला. पाचव्या पराभवामुळे 16 लढतीनंतर त्यांचे 25 गुण आणि पाचवा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीकडून 4-2 फरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपाही जमशेदपूर संघाने काढला.

मुंबईची पेनल्टीवर बरोबरी

विश्रानंतर लगेच राहुल भेके याने पिछाडी कमी केल्यानंतर सामन्यातील अखेरची वीस मिनिटे मुंबई सिटीसाठी नाट्यमय ठरली. 71व्या मिनिटास स्पॅनिश इगोर आंगुलोचा पेनल्टी फटका गोलरक्षक टीपी रेहेनेश याने दक्ष राहत अडविल्यामुळे मुंबई (mumbai) सिटीची बरोबरीची संधी हुकली, मात्र सामना संपण्यास सहा मिनिटे असताना ब्राझीलच्या दिएगो मॉरिसियो याने पेनल्टी फटका अचूक मारल्यामुळे गतविजेत्यांना पिछाडी भरून काढता आली. पीटर हार्टलीने मॉरिसियोला मागून पाडणे जमशेदपूरला खूपच महागात पडले. मॉरिसियोचा हा मुंबईतर्फे आयएसएल (ISL) स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

Jamshedpur beat eventual winners Mumbai City
गोव्याची सुरक्षा ऐरणीवर, निम्म्याहून अधिक सीसीटीव्ही बंद

पूर्वार्धात जमशेदपूरची आघाडी

सामन्याच्या अर्ध्या तासातील खेळात जमशेदपूरने (Jamshedpur) दोन गोलांची भक्कम आघाडी घेतली. त्यांच्यासाठी गोल खाते उघडताना स्कॉटलंडच्या ग्रेग स्टुअर्ट याने मोसमातील वैयक्तिक आठवा गोल केला. मध्यरक्षक ऋत्विक दासच्या असिस्टवर स्टुअर्टने शानदार फटक्यावर अचूक नेम साधला. नंतर स्वतः ऋत्विकने आयएसएलमध्ये प्रथमच गोल नोंदवत जमशेदपूरची आघाडी वाढविली. गोलक्षेत्रात डॅनियल चिमा चुक्वू याच्याकडून मिळालेल्या क्रॉस पासवर ऋत्विकने प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाज याला संधीच दिली नाही.

जाहूच्या दुखापतीमुळे धक्का

मुंबई सिटीस 18 व्या मिनिटास धक्का बसला. 33 वर्षीय हुकमी मध्यरक्षक अहमद जाहू याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा विनीत राय याने घेतली. मोरोक्कोच्या खेळाडूने यंदा स्पर्धेत सर्वाधिक सात असिस्टची नोंद केली असून तीन गोलही केले आहेत. जाहूच्या अनुपस्थितीचा मुंबई सिटीच्या आक्रमणावर परिणाम झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com