'जमशेदपूर एफसी'चा व्हॅल्सकिस 'ईस्ट बंगालसाठी' आव्हानात्मक
जमशेदपूर एफसीच्या नेरियूस व्हॅल्सकिस याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात जबरदस्त झंझावात राखताना पाच गोल नोंदविले आहे. आज वास्को येथील टिळक मैदानावर खेळताना ईस्ट बंगालसमोर लिथुआनियाच्या या ३३ वर्षीय आघाडीपटूचा मोठा धोका असेल.
पणजी : जमशेदपूर एफसीच्या नेरियूस व्हॅल्सकिस याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात जबरदस्त झंझावात राखताना पाच गोल नोंदविले आहे. आज वास्को येथील टिळक मैदानावर खेळताना ईस्ट बंगालसमोर लिथुआनियाच्या या ३३ वर्षीय आघाडीपटूचा मोठा धोका असेल.
यंदा आयएसएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ईस्ट बंगालची प्रतिष्ठा पणास लागली आहे. शतकी परंपरा असलेल्या कोलकात्याच्या या संघाच्या मोहिमेची सुरवात नामुष्कीजनक ठरली आहे. इंग्लंडच्या रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने तिन्ही सामने गमावले असून त्यांना २७० मिनिटांच्या खेळात एकही गोल नोंदविता आलेला नाही. त्यांनी तब्बल सात गोल स्वीकारले आहेत. ‘‘आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जमशेदपूरविरुद्धचा सामना कठीण असेल, त्यामुळे आम्हाला प्रयत्न करून प्रगती साधावी लागेल. कामगिरीनुसार आम्ही खूप वाईट खेळलो नाही. निकाल आमच्या विरोधात गेले,’’ अशी प्रतिक्रिया फावलर यांनी दिली.
नेरियूस व्हॅल्सकिसचा धडाका...
- आयएसएलमध्ये गतमोसमात चेन्नईयीन सिटीचे प्रतिनिधित्व
- २०१९-२० मोसमातील २० सामन्यांत १५ गोलसह गोल्डन बूटचा मान
- यंदा ४ सामन्यांत ५ गोल, २ सामन्यांत प्रत्येकी २ गोल
- ४ सामन्यांत एकूण ७ शॉट ऑन टार्गेट