टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना
Japans new measures for the Tokyo Olympics

टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिकसाठी जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

जपानमध्ये राष्ट्रीय लसीकरणाची मोहीम मागे पडली असून राजधानी टोकियोत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी जपानी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे. नागरिक रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून नंतर त्याचा प्रसार शाळा, कार्यालयांकडे होत जाणार आहे. नव्या कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 11 मे पर्यंत नागरिकांना नव्या कार्यप्रणालीचे पालन करावे लागणार आहे. (Japans new measures for the Tokyo Olympics)

पश्चिमी जपानमधील क्योटो आणि ओकिनावो या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे जपानच्या पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, मियामी शहरांमध्ये सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोनासंबंधीच्या उपाययोजना राबवण्यात विलंब होत असल्यामुळे जपान सरकारवर टिकाही होत होती. टोकियोमधील टाळेबंदी उठवल्य़ानंतर तीन आठवड्यानंतर नव्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. ओसाकामधील सर्व रुग्णालयामध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे वैद्यकीय आणिबाणीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या ऑलिम्पिक ज्योतीचा कार्यक्रमही अन्य ठिकाणाहून वळवण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com