जसप्रीत बुमराहच्या लग्नचर्चेवर अखेर शिक्कामोर्तब

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मिडियावर एक पोस्ट करत लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब केला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशनशी लग्न करणार आहे. मात्र जसप्रीत आणि संजना या दोघांनीही अद्याप तरी मौण बाळगले आहे. अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मिडियावर एक पोस्ट करत लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब केला आहे.

तारा शर्मा सलुजाने तिच्या इन्टाग्राम आकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्य़े जसप्रीत, तारा, आणि तिचं मुलं दिसत आहेत. ताराने या पोस्टखाली दिलेल्या कॅप्शनमुळे जसप्रीत बुमराह आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. तारा शर्मा तुझ्या शोमधल्य़ा तुझ्या सहभागाबद्द्ल धन्यवाद. आणि तुम्हाला दोघांनाही एकत्र 6 व्या पर्वात पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.’’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

INDVsENG T20 Series : भारत विरूद्ध इंग्लंड पहिला T20 सामना आज

जसप्रीत बुमराह आणि संजना 14-15 मार्चला गोव्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोरोनाच्या संकटामुळे विवाहसाठी काही मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. 

 

संबंधित बातम्या