T20 World Cup: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, T20 वर्ल्ड कपसाठी बुमराह टीम इंडियातच!

T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahDainik Gomantak

T20 World Cup 2022, Jasprit Bumrah: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला. बुमराहच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकात तो टीम इंडियाचा भाग नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या, परंतु अहवालानुसार तो अजूनही संघाचा भाग असू शकतो.

भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या T20 सामन्यानंतर जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र अजून तो टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही. त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीसाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह 6 ऑक्टोबरला संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे. मात्र, 15 ऑक्टोबरपर्यंत टी-20 विश्वचषकात त्याचे भवितव्य ठरणार आहे.

jasprit bumrah
T20 World Cup: या राखीव खेळाडूला मिळणार Team India मध्ये स्थान!

T20 विश्वचषकात स्थान मिळू शकते

बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “बुमराहला विश्रांतीची गरज आहे, कारण पाठीच्या दुखापतीसाठी हे सर्वोत्तम औषध आहे. सध्या तो एनसीएच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहे. नितीन त्याच्या रिकव्हरीवर थेट लक्ष ठेवून आहे. आम्ही त्याला T20 विश्वचषकातून पूर्णपणे वगळलेले नाही. तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. आमच्याकडे बदल करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com