Ranji Trophy Video: पहिल्याच ओव्हरमध्ये उनाडकटचा राडा, हॅट्रिकसह केली ऐतिहासिक कामगिरी

Video: जयदेव उनाडकटने रणजी सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्रिक घेतली आहे.
Jaydev Unadkat first bowler to take a hat-trick in the opening over of a Ranji Match
Jaydev Unadkat first bowler to take a hat-trick in the opening over of a Ranji MatchDainik Gomantak

Jaydev Unadkat Hat-Trick: भारतात सध्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी सौराष्ट्र विरुद्ध दिल्ली सामना सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच षटकात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला. उनाडकटचा हा ९८ वा प्रथम श्रेणी सामना आहे.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सौराष्ट्रकडून उनाडकटने पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर ध्रुव शोरेला त्रिफळाचीत केले.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने वैभव रावलला हार्दिक देसाईच्या हातून झेलबाद केले, तर पाचव्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार यश धूल पायचीत झाला. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा उनाडकट पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी कर्नाटकच्या विनय कुमारने 2017-18 रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या आणि तिसऱ्या षटकात मिळून हॅट्रिक साजरी केली होती.

दरम्यान, दिल्लीविरुद्ध उनाडकटने एकूण 8 विकेट्स घेतल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे एका क्षणी दिल्लीचा संघ 4 धावांवर 5 विकेट्स असा संघर्ष करत होता. पण तळातील फलंदाज हृतिक शोकिन आणि शिवांक वशिष्ठ यांनी केलेल्या 80 धावांच्या भागीदारीमुळे दिल्लीला पहिल्या डावात 35 षटकात 133 धावा करता आल्या.

हृतिकने नाबाद 68 धावा केल्या आणि शिवांक वशिष्ठने 38 धावांची खेळी केली. सौराष्ट्रकडून या डावात चिराग जानी आणि प्रेरक मंकड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Jaydev Unadkat first bowler to take a hat-trick in the opening over of a Ranji Match
Ranji Trophy: नया है यह! स्वत:च्याच नावाच्या स्टेडियमवर खेळतोय बंगालचा ओपनर, वडिलांनी केलाय खर्च

उनाडकटचे भारतीय संघात 12 वर्षांनी पुनरागमन

काही दिवसांपूर्वीच उनाडकटने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते. त्याला डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. हा त्याचा कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना ठरला होता.

यापूर्वी त्याने पहिला कसोटी सामना 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतक 12 वर्षे त्याला दुसरा सामना खेळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com