Jhulan Goswami
Jhulan Goswami Dainik Gomantak

वेगवान गोलंदाज Jhulan Goswami ला अलविदा करताना हरमनप्रीतला अश्रू अनावर

Jhulan Goswami Retirement: जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाज झुलन गोस्वामी तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.

Jhulan Goswami Retirement: जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाज झुलन गोस्वामी तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना झुलन गोस्वामीचा शेवटचा सामना आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले, ज्यांनी सर्व चाहत्यांची मने जिंकली.

दरम्यान, झुलन गोस्वामी 2 दशकांनंतर निवृत्त होत आहे. झुलन गोस्वामीच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 39 वर्षीय झुलन गोस्वामीने 20 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली होती. 2009 मध्ये हरमनप्रीतने झुलनच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. झुलन गोस्वामीच्या शेवटच्या सामन्यावर कर्णधार हरमनप्रीतसह अनेक खेळाडू यावेळी रडले.

Jhulan Goswami
Women’s World Cup 2022: झुलन गोस्वामी मोडणार रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध मोठी शक्यता!

दुसरीकडे, झुलन गोस्वामी ही क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. सामना सुरु होण्यापूर्वी झुलन म्हणाली, 'बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल, माझे कुटुंब, प्रशिक्षक, कर्णधार सर्वांचे आभार. या संधीबद्दल धन्यवाद, हा एक खास क्षण आहे.'

Jhulan Goswami
WWC 2022: मिताली राज नंतर झुलन गोस्वामीने नावावरती केला नवा विक्रम

तसेच, झुलन गोस्वामीने भारतासाठी 6 जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्ध (England) पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि ती आता या संघाविरुद्ध शेवटचा सामनाही खेळत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी क्लेअर कॉनर आणि मुख्य प्रशिक्षक लिसा किटले यांनी झुलन गोस्वामीला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com