Team India: 'हा' युवा खेळाडू लवकरच टीम इंडियाकडून खेळणार, जो रुटने केली भविष्यवाणी

Indian Premier League Joe Root: इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जो रुटला अद्याप आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Indian Premier League Joe Root: इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जो रुटला अद्याप आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

मात्र, या हंगामाच्या मध्यात जो रुटने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने भारतीय क्रिकेटच्या अशा तरुण खेळाडूचे नाव सांगितले आहे, जो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. या युवा खेळाडूने आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

हा युवा खेळाडू लवकरच टीम इंडियाकडून खेळणार आहे

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल अतिशय प्रतिभावान असून लवकरच भारताकडून (India) खेळेल, असा विश्वास जो रुटने व्यक्त केला. आयपीएलच्या या मोसमात यशस्वीने 13 सामन्यात 47.91 च्या सरासरीने 575 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.

Team India
Ravi Shastri on Team India: शास्त्रींचा मोठा दावा, '2007 मधील धोनी ब्रिगेडच्या मार्गावरच हार्दिकची टीम इंडिया...'

पीटीआयशी बोलताना रुट म्हणाला की, 'लवकरच तुम्हाला तो भारताकडून खेळताना दिसेल. त्याच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.

तो सतत शिकत असतो. तो इतर खेळाडूंकडून शिकतो. यावेळी त्याच्या खेळात कोणतीही कमतरता नाही. त्याने फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.'

Team India
Team India: WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, 'हा' तगडा फलंदाज दुखापतीमुळे...

भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा फायदा मिळेल

आयपीएलचा (IPL) अनुभव ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकात कामी येईल, असेही रुट म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, 'या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव खूप उपयोगी पडेल. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळून, आम्हाला येथे कसे खेळायचे हे कळत आहे. वर्षाच्या शेवटी आम्ही येथे आल्यावर हा अनुभव खूप उपयुक्त ठरेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com