विराट कोहली नाही तर ''या'' कर्णधाराला मिळते सर्वाधिक वेतन

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेश दौर्‍यावर असून वनडे मालिका खेळत आहे.

श्रीलंका क्रिकेटमध्ये पगार कपात केल्यावरून वाद निर्माण झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SCB) खेळाडूंच्या पगारामध्ये 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू त्यांच्या बोर्डवर संतापले आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या खेळाडूंनी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यास नकार दिला आहे. तथापि, श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेश दौर्‍यावर असून वनडे मालिका खेळत आहे. आता या एकदिवसीय मालिकेनंतरच श्रीलंका बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील पगाराच्या वादावर कोणताही निर्णय घेता येईल. प्रत्येक क्रिकेट बोर्ड त्याच्या खेळाडूंसाठी वार्षिक वेतन देते. याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात कोणत्या कर्णधारांना सर्वात जास्त पगार मिळतो.(Joe Root is the highest paid captain)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4 दिग्गज खेळाडूंनी खेळला होता एकमेव टी-20 सामना

जो रूट (Joe Root)

Joe Root (@root66) | Twitter

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटचा पगार सध्या इतर कर्णधारांपैकी सर्वाधिक आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून जो रुटला दरवर्षी 8.97 कोटी रुपये मिळतात. जो रूट इंग्लंड संघाचा प्रतिभाशाली खेळाडू आहे. इंग्लंडकडून खेळताना रुटने 103 कसोटी सामन्यात 8,671 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 20 शतके आणि 49 अर्धशतके आहेत. जो रुटने आतपर्यंत कसोटी सामन्यात 5 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 
 

विराट कोहली (Virat Kohli)

Virat Kohli Cricketer Player - Free vector graphic on Pixabay

भारताचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोहलीला बीसीसीआयकडून वर्षाकाठी 7 कोटी रुपये पगार मिळतो. विराट भारतीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार आहे. विराटने आतापर्यंत 91 कसोटी सामन्यात 13,112 धावा केलेल्या आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात 13,061 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतके आहेत. 

अ‍ॅरॉन फिंच आणि टिम पेन

Tim Paine - Wikipedia

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनला ऑस्ट्रेलिया मंडळाकडून वार्षिक 4.87 कोटी रुपये मिळतात. एकदिवसीय कर्णधार फिंचला ऑस्ट्रेलिया बोर्ड तितकीच रक्कम देते. टीम पेनला चांगला यष्टीरक्षक म्हणून देखील ओळखले जाते. टीम पेनने 35 कसोटी सामन्यात 32.66 च्या सरासरीने 3355 धावा केल्या आहेत. तसेच पिंच ऑस्ट्रेलीयाचा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

इयन मॉर्गन

Eoin Morgan of England | Ben Sutherland | Flickr

इंग्लंडचा टी -20 आणि वनडे कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांना इंग्लिश बोर्ड दरवर्षी 1.75 कोटी रुपये देते. मॉर्गन आयपीएलमध्ये (IPL 2021) केकेआरच्या (KKR) संघाचा कर्णधारही आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने विश्वचषक देखील जिंकला होता. मार्गन इंग्लंच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २४३ सामने खेळले आहेत.  

केन विल्यमसन

File:Kane Williamson (9773667991).jpg - Wikimedia Commons

न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनला वार्षिक 1.77 कोटी रुपये पगार दिला जातो.  विल्यमसनलाही 30 लाख रुपयांचा बोनस देखील मिळतो. केन विल्यम्सनने (kane williamson) आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शेवटच्या काही सामन्यात एसआरएचच्या (SRH) संघाचं नेतृत्व केले होते. केनने न्यूझीलंड संघाला विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामान्यपर्यंत नेले होते.   

बाबर आजम

SA vs Pak - 3rd ODI - Babar Azam revels in his top order conquering South  Africa

पाकिस्तानच्या मंडळाकडून पाकिस्तानच्या बाबर आझमला वार्षिक  62.4 लाख रुपये वेतन मिळते. अलीकडेच बाबरला पाकिस्तानच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार बनविण्यात आले आहे. बाबर सध्या विराट कोहलीशी स्पर्धा करताना दिसत  आहे. फलंदाज म्हणून कोहली आणि बाबरची तुलना केली जात आहे.

 

संबंधित बातम्या