खास विक्रम! वॉल्टर हॅमंड अन् ग्रॅहम गूचसारख्या दिग्गजांच्या यादीत जो रूटचे नाव

माजी इंग्लिश कर्णधार जो रूट भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
Joe Root made history
Joe Root made history Dainik Gomantak

भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी सुरू झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीमध्ये संपली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर यावर्षी 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लिश संघाने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. (Joe Root name on the list of veterans like Walter Hammond and Graham Gooch)

Joe Root made history
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांना उपविजेतेपद

अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टो या सामन्याचा हिरो ठरला आहे. त्याने संघासाठी दोन्ही डावात चांगली फलंदाजी करत शतक झळकावले आहे. बेअरस्टोला त्याच्या सर्वोत्तम खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केल्याबद्दल माजी इंग्लिश कर्णधार जो रूटला 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताब देण्यात आला आहे.

माजी इंग्लिश कर्णधार भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज होता. या मालिकेत पाच सामने खेळताना त्याने नऊ डावांमध्ये 105.28 च्या सरासरीने सर्वाधिक 737 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार शतके आणि एक अर्धशतक झळकले आहे.

या मालिकेत तो दोनदा नाबाद देखील राहिला आहे. भारताविरुद्ध खेळलेल्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर इंग्लिश फलंदाजाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरं तर, तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीमध्ये सामील झाला आहे.

इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटच्या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जो विक्रम आहे तो माजी क्रिकेटपटू वॉल्टर हॅमंडच्या (Wally Hammond) नावावर आहे. हॅमंडने 1928/29 अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 905 धावा केल्या होत्या तर इंग्लंडकडून मालिकेतील खेळाडूची ही सर्वोच्च धावसंख्या देखील आहे.

हॅमंडनंतर माजी फलंदाज ग्रॅहम गूचचे नाव दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर गूचने 1990 मध्ये भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 752 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 456 धावा केल्या होत्या आणि सामन्याच्या पहिल्या डावात गूचने 333 तर दुसऱ्या डावात 123 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com