भारताच्या पराभवाचं कारण जोफ्रा आर्चरनं सागितलं!

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट हा भारताच्या पराभवामध्ये आणि इंग्लडच्या विजयासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला.

अहमदाबाद: भारत- इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेनंतर भारताचा विजय पाहून इंग्लडविरुध्द टी-20 मालिकेमध्ये टीम इंडियाकडून आपेक्षा वाढल्या होत्या. पण इंग्लंडविरुध्दच्या पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सामन्यानंतर आपण प्रत्येकाने टीम इंडियाच्या पराभवाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सामना संपल्यानंतरच्या कार्यक्रमात भारताच्या पराभवाचं कारण त्याने त्याच्या शब्दात सांगितले आहे. त्याच्या मतानुसार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट हा भारताच्या पराभवामध्ये आणि इंग्लडच्या विजयासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुध्द सलग दुसऱ्य़ांदा आणि गेल्य़ा महिन्याभरात तिसऱ्यांदा खातं न खोलता बाद झाला आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या इंग्लंडने भारताला 8 विकेट राखून पराभूत केलं. भारताने इंग्लडसमोर 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडनं 2 विकेट्स राखत हे आव्हान लिलया पार केलं. श्रेयस अय्यर वगळता टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज सपशेल अपय़शी ठरले. टीम इंडियाचा खुद्द कर्णधार शून्यावर बाद झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आदील रशिदच्या गोलंदाजीवर ख्रिस जॉर्डननं विराट कोहलीचा झेल टिपला.

Ind vs Eng T20: पंतचा अफलातून षटकार; केविन पीटरसनने केलं कौतुक

 भारताच्या पराभवाविषयी इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर म्हणाला, ‘’टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं अपयश भारतीय संघाचा आत्मविश्वास खच्ची करणारं ठरलं असावं. आणि विराट कोहलीचं बाद होणंच आपलं वर्चस्व राखण्यात इंग्लंडच्या संघाला फायदा झाला असावा. विराट कोहली नि:संशय धोकादायक फलंदाज आहे. त्यामुळे इतक्या वेळा त्याला लवकर मैदानावरुन परत जाताना पाहणं आमच्यासाठी बोनसचं होतं. आणि त्याचाच भारतीय संघाला धक्का बसला असेल.’’ 
 

संबंधित बातम्या