जोफ्रा आर्चर तस्लिमा नसरीन यांच्यावर भडकला; जाणून घ्या प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने तस्लिमा नसरीन यांच्या ट्विटवर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंडचा प्रसिध्द क्रिकेटपटू मोईन अलीबद्दल बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. ''मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर तो आयसीसमध्ये सामील होण्यासाठी सिरीयाला गेला असता,’’ असे ट्विट नसरीन यांनी केले होते. या ट्विटनंतर त्यांना मोठ्यप्रमामावर ट्रोलिंगला सामोरे जावं जावे लागले आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विटबद्दल संताप व्य़क्त केला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने तस्लिमा नसरीन यांच्या ट्विटवर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही बरे आहात? मला वाटत नाही, की तुम्ही ठीक आहात,’’ असे आर्चरने नसरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. आर्चरच्या ट्विटनंतर तस्लिमा नसरीन यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाव लागत आहे. त्यानंतर नसरीन यांनी आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधून उत्तर कोरियाची माघार

 

मी हे ट्विट उपहासाने केले होते, हे टिकाकारांना चांगलेच माहीत आहे. परंतु त्यांनी मला अपमानित करण्याचे ठरवले आहे, कारण मी मुस्लिम समाज धर्मनिरपेक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. मी इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते. मानवजातीची ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, की स्त्रीवादी डावे स्त्रीविरोधी इस्लामवाद्यांना पाठिंबा देत आहेत,’’ असे तस्लिमा नसरीन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान सीपीआयएमएलच्या नेत्या कविता कृष्णन यांनीही नसरीन यांच्या ट्विटवर भडक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, तस्लिमा नसरीन यांना लेखक म्हणून नव्हे तर कट्टर व्यक्ती म्हणून लक्षात ठेवले जाईल.

 

संबंधित बातम्या