INDvsENG : दुसऱ्या कसोटीआधी इंग्लंडला मोठा धक्का; जोफ्रा आर्चर संघाबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू शकणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू शकणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.उजवा कोपरा दुखाल्यामुळे जोफ्रा आर्चर शनिवारी चेन्नईत सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळणार नाही.पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानदेखील तो अस्वस्थ होता. इंग्लंडने हा 227 धावांनी सामना जिंकला.भारत विरूद्ध इंग्लंड दुसरा सामना उद्यापासून एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

हा ठरला आयपीएल 2021च्या अंतिम लिलाव यादीतला सर्वात तरूण खेळाडू

“ही दुखापत कोणत्याही पूर्वीच्या दुखापतीशी संबंधित नसून, अशी अपेक्षा आहे की लवकरच तो तंदुरूस्त होईल आणि गोलंदाज अहमदाबादमधील तिसर्‍या कसोटी सामन्यात परतू शकेल”,असे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. आर्चरच्या बाहेर पडल्यानंतर जेम्स अँडरसनसह अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडची संघात निवड होणार आहे. याशिवाय पहिल्या कसोटीत भाग घेणारा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरही इंग्लंडला परतला आहे. त्याच्या जागी बेन फॉक्सला संधी मिळेल. फॉक्सला पाच कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), ऑली पोप, डॅनियल लॉरेन्स, डोमिनिक सिब्ली, मोईन अली, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स, रोरी बर्न्स, बेन फॉक्स (विकेटकीपर), जेम्स अँडरसन, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि ऑली स्टोन 

"विराट कोहलीच्या कॅप्टन्सीबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही"

भारतीय संघ  - विराट कोहली (कॅप्टन),अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, रिषभ पंत, रिद्धिमन साहा, केएल राहुल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा , मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या