IND vs AUS: विराट-रोहितचा मोठा 'शत्रू' फिट, WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा बनणार काळ!

WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने त्याच्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.
Rohit Sharma & Virat Kohli
Rohit Sharma & Virat Kohli Dainik Gomantak

WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) च्या अंतिम सामन्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने त्याच्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

हेझलवूड दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या मध्यातूनच मायदेशी परतला होता. मात्र, आता तो त्याच्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 7 जूनपासून ओव्हलवर हा सामना खेळवला जाणार आहे.

कोहली-रोहितचा मोठा 'शत्रू' फिट

ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) फायनलपूर्वी कठोर मेहनत घेत आहे. जोश हेझलवूडने सोमवारी संघासोबत सराव केला. यावेळी त्याने सांगितले की, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मला पॉझिटीव्ह वाटत आहे.

हेझलवूड पुढे म्हणाला की, 'माझा फिटनेस खूप चांगला आहे आणि आता सामना सुरु होईपर्यंत प्रत्येक सत्रात चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.'

तो पुढे असेही म्हणाला की, 'मी माझ्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करण्याच्या अगदी जवळ आहे. मी प्रत्येक पुढील सत्रात पूर्वीपेक्षा जास्त सराव करत आहे, त्यामुळे मला बरे वाटत आहे.'

Rohit Sharma & Virat Kohli
IND vs AUS: चेन्नई वनडेत मैदानावरच विराटचा स्टॉयनिसला जोरदार धक्का, Video होतोय व्हायरल

विराट-सिराजची जोरदार स्तुती केली

7 जूनपासून ओव्हल येथे सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी जोश हेझलवूडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे सहकारी विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराज यांचे कौतुक केले आहे. ओव्हलवर कोहलीची विकेट हेच त्याचे लक्ष्य असेल.

Rohit Sharma & Virat Kohli
IND vs AUS 3rd ODI: कागांरुनी कशी केली टीम इंडियावर कुरघोडी? जाणून घ्या 5 कारणे

हेझलवूड म्हणाला की, ''तो (विराट) जी मेहनत घेतो ती अतुलनीय आहे. प्रथम त्याचा फिटनेस आणि नंतर विशेषत: फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील त्याचे कौशल्य वाखणण्याजोगे आहे.

सरावासाठी येणारा तो नेहमीच पहिला आणि निघणारा शेवटचा असतो. तो खूप कठोर सराव करतो. तो इतर खेळाडूंनाही प्रेरणा देऊ शकतो.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com