वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलम्ध्ये पोहोचल्यावर के एल राहुलने केलं विराट कोहलीचं कौतुक

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. संघाने चॅम्पियनशिपमध्ये एकूण 6 मालिका खेळल्या आणि 5 जिंकल्या. भारत फक्त एका मालिकेत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. एकूण गुण आणि सरासरी गुणांच्या आधारे टीम इंडिया अव्वल राहिली. आयसीसीने ऑगस्ट 2019 पासून चॅम्पियनशिपची सुरुवात केली. यात 9 संघांना संधी देण्यात आली. चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया 520 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

Ind vs Eng: चौथ्या कसोटीत सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव

सरासरी गुणांविषयी बोलताना टीम इंडियाने सर्वाधिक 72.2 ची सरासरी नोंदविली आहे. आता या चॅम्पियनशिपची अंतिम लढत भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 ते 22 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल म्हणाला की कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण संघाचे हेच लक्ष्य होते. के एल राहुल म्हणाला, "गेल्या दोन वर्षांत आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी कधीही हार मानली नाही. कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघानी हेच लक्ष ठेवून मेहनत घेतली."

ISL 2020-21: 'सुपर सब` सिला नॉर्थईस्टच्या मदतीस; इंज्युरी टाईम गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरीत रोखले

इंग्लंडला शेवटच्या सामन्यात मात दिल्यानंतर विराट कोहली म्हणाला," गेल्या 2 वर्षात आम्ही ज्या प्रकारे खेळलो, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पात्र आहोत. आता आमचे लक्ष जूनमध्ये होणाऱ्या या मोठ्या सामन्यावर आहे."चौथ्या कसोटीच्या निकालानंतर (भारत विरुद्ध इंग्लंड) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) नवीन रँकिंग जाहीर केले. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका 3-1 ने जिंकल्यानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली आहे. न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. टीम इंडियाचे 122 गुण असून न्यूझीलंडचे 118 गुण आहेत.

संबंधित बातम्या