Goa Professional League : कळंगुटच्या विजयात सिद्धांतची छाप

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

सिद्धांत कुंडईकर याने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर कळंगुट असोसिएशनने मंगळवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत निसटता विजय नोंदविला.

पणजी : सिद्धांत कुंडईकर याने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर कळंगुट असोसिएशनने मंगळवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत निसटता विजय नोंदविला. त्यांनी पणजी फुटबॉलर्सला 3-2 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. (Kalangut Association beat Panaji Footballers in Goa Professional League Football Tournament)

टोकियो ऑलिम्पिकमधून उत्तर कोरियाची माघार

कळंगुटला पूर्ण तीन गुण मिळवून देताना सिद्धांतने अनुक्रमे 9 व 12व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सिद्धार्थ कुंडईकर याने अन्य एक गोल 57व्या मिनिटास केला. पणजी फुटबॉलर्ससाठी लॉईड कार्दोझ याने 43व्या, तर पांडुरंग गावस याने 48व्या मिनिटास गोल नोंदवून खिंड लढविली. उत्तरार्धातील काही मिनिटे बाकी असताना कळंगुट असोसिएशनच्या जिर्जर तेरांग याला दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, एक खेळाडू कमी झाल्यानंतरही कळंगुटने आघाडी कायम राखली. कळंगुट असोसिएशनचा हा 10 सामन्यांतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 17 गुण झाले आहेत. पणजी फुटबॉलर्सला पाचवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे 10 गुण कायम राहिले.

सामन्याच्या प्रारंभीच कळंगुटला आघाडी मिळाली. आकाश सनदी याने दिलेल्या बॅक पासवर पणजी संघाचा जॅनियो फर्नांडिस वेळीच चेंडू दिशाहीन करू शकला नाही, त्याचा लाभ उठवत सिद्धांतने कळंगुटला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तीन मिनिटानंतर सिद्धांतने पुन्हा अचूक नेम साधला. निक्सन कास्ताना याने कौमे ज्युनियर याला लाँग पास केला. यावेळी पणजीचा प्रेस्टन रेगो याला कौमे याला रोखणे शक्य झाले नाही, त्याला लाभ सिद्धांतला झाला व त्याने कळंगुटच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली. सामन्याच्या 16व्या मिनिटास सिद्धांतला हॅटट्रिकची संधी होती, परंतु कौमे ज्युनियर याच्या असिस्टवर सिद्धांत प्रतिस्पर्धी गोलरक्षकास वेळीस चकवू शकला नाही. 

RCB त धनश्रीला स्थान द्या; नवदीपच्या ट्विटवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया 

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना पणजीच्या लॉईज कार्दोझ याने कळंगुटचा गोलरक्षक परमवीर सिंग याला चकविले, त्यापूर्वी परमवीर आणि कृष्णनाथ शिरोडकर यांच्या दक्षतेमुळे पणजी फुटबॉलर्सला गोल नोंदविता आला नव्हता. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्या मिनिटास पांडुरंगने पणजी फुटबॉलर्सला 2-2 गोलबरोबरी साधून दिली. त्याचा ताकदवान फटका रोखणे कळंगुटचा गोलरक्षक परमवीर याला अजिबात शक्य झाले नाही. तासाभराच्या खेळास तीन मिनिटे बाकी असताना सिद्धार्थ कुंडईकरने सणसणीत फटक्यावर कळंगुटला पुन्हा आघाडी मिळवून दिली.  त्यानंतर जॉयसन गांवकार याचा फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे पणजीला बरोबरी साधता आली नाही, तर सिद्धांतचा आणखी एक प्रयत्न वाया गेल्यामुळे कळंगुटची आघाडी वाढू शकली नाही.
 

संबंधित बातम्या