Kane Williamson: विलियम्सनचे रेकॉर्डब्रेक शतक! टेलरच नाही, तर गांगुली-सेहवागचाही मोडला विक्रम

वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने शतकी खेळी केली आहे. याबरोबर त्याने मोठे विक्रमही नावावर केले.
Kane Williamson
Kane Williamson Dainik Gomantak

Kane Williamson: वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलिम्सनने न्यूझीलंडकडून खेळताना दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. त्याच्या शतकाने न्यूझीलंडला या डावात सावरले आहे.

या सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या डावात 226 धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला होता. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला विलियम्सनने बाहेर काढले. त्याने दुसऱ्या डावात 282 चेंडूत 132 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

विलियम्सन आता न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना रॉस टेलरला मागे टाकले आहे. विलियम्सनचे आता कसोटीत 92 सामन्यात 53.33 च्या सरासरीने 7787 धावा झाल्या आहेत. त्यामुळे आता तो सर्वाधिक कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे. या यादीत टेलर दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. टेलरने 112 कसोटीत 7683 धावा केल्या आहेत.

Kane Williamson
Kane Williamson: विश्वविजेता विलियम्सनने सोडले कसोटी कर्णधारपद, न्यूझीलंडला मिळाला नवा 'कॅप्टन'

सेहवाग-गांगुलीला टाकले मागे

विलियम्सनने इंग्लंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत केलेले शतक हे त्याचे कारकिर्दीतील २६ कसोटी शतक, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 39 वे शतक आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत मार्क वॉ, सौरव गांगुली, ऍलिस्टर कूक आणि विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे. या चौघांनीही प्रत्येकी 38 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

तसेच विलियम्सनने या यादीत तिलत्करने दिलशान आणि मोहम्मद युसूफ यांची बरोबरी केली आहे. त्यांनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 39 शतके केली आहेत. या यादीत 100 शतकांसह अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे.

Kane Williamson
New Zealand vs England: एमएस धोनीला बॅटिंगमध्ये भारी पडला किवी गोलंदाज, मोडलाय 'हा' मोठा रेकॉर्ड

सामना रोमांचक स्थितीत

दरम्यान वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 8 बाद 435 धावांवर घोषित केला होता. या डावात इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने 176 चेंडूत 186 धावा आणि जो रुटने 224 चेंडूत नाबाद 153 धावांची शतकी खेळी केली होती. या डावात न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवरच संपुष्टात आला. या डावात कर्णधार टीम साऊथीने 49 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती. इंग्लंडकडून या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फॉलोऑन मिळाल्याने न्यूझीलंड संघ पुन्हा फलंदाजीसाठी उतरला. दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली. विलियम्सन व्यतिरिक्त न्यूझीलंडकडून टॉम लॅथम(83), डेवॉन कॉनवे (61) आणि टॉम ब्लंडेल (90) यांनी अर्धशतके केली. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 483 धावा करत इंग्लंडसमोर 258 धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सोमवारी (27 फेब्रुवारी) सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर 11 षटकात 1 बाद 48 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com