Kane Williamson: विश्वविजेता विलियम्सनने सोडले कसोटी कर्णधारपद, न्यूझीलंडला मिळाला नवा 'कॅप्टन'

केन विलियम्सनने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
Kane Williamson
Kane WilliamsonDainik Gomantak

Kane Williamson: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू केन विलियम्सनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल गुरुवारी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. त्यामुळे न्यूझीलंडने आगामी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नव्या कर्णधारासह संघाची घोषणा केली.

न्यूझीलंडने आता टीम साऊदीकडे कसोटी कर्णधारपद सोपवले आहे. तसेच टॉम लॅथम उपकर्णधार असेल, तर विलियम्सन संघात केवळ खेळाडू म्हणून खेळेल.

कसोटी कर्णधार म्हणून विलियम्सनची कारकिर्द शानदार राहिली आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2021 ची आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धा जिंकली आणि न्यूझीलंड कसोटी क्रिकेटमधील पहिला विश्वविजेता संघ ठरला.

Kane Williamson
ICC ODI Rankings: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या ईशानची ICC क्रमवारीत गगनभरारी!

विलियम्सनने 40 कसोटीत न्यूझीलंडचे नेतृत्व करताना 22 सामन्यांत विजय मिळवले. तसेच 8 सामना अनिर्णित राहिले, तर केवळ 10 सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

कर्णधारपद सोडल्यानंतर विलियम्सन म्हणाला, 'कसोटीत न्यूझीलंडचे नेतृत्व करणे शानदार होते आणि हा विशेष बहुमान होता. माझ्यासाठी क्रिकेटमध्ये कसोटी प्रकार शिखर आहे. मी या प्रकारात नेतृत्व करण्याच्या आव्हानाचा आनंद घेतला.'

दरम्यान, विलियम्सन मर्यादीत षटकात न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे. तो पुढे म्हणाला, 'कर्णधारपद तुमची मैदानावरील आणि मैदानाबाहेर जबाबदारी वाढवते. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर आता मला वाटते की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.'

'न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर आम्हाला वाटले की मर्यादीत षटकात नेतृत्वाची जबाबदारी कायम करावी, कारण आगामी काळात दोन वर्ल्डकप खेळायचे आहे.' आगामी काळात 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप आणि 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.

Kane Williamson
France vs Morocco: मोरोक्कोचे सप्न भंगले! फ्रान्स सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये

तसेच विलियम्सननंतर आता न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणारा साऊदी म्हणाला, 'गेले काही दिवस विश्वसनीय होते आणि कसोटी कर्णधारपदी नियुक्त होणे, हा मोठा सन्मान आहे. मला कसोटी क्रिकेट आवडते आणि हे आव्हानात्मक आहे. मी संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.'

साऊदीने असेही सांगितले की केन कसोटीमधील शानदार कर्णधार राहिले आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबर रोजी सुरूवात होईल.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ - टीम साऊदी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, केन विल्यमसन, विल यंग .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com