Kane Williamson चे न्यूझीलंड संघात पुनरागमन, या दिग्गजांनाही मिळाली संधी

New Zealand Vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे.
Kane Williamson
Kane WilliamsonDainik Gomantak

New Zealand Vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे. प्रदीर्घ काळानंतर केन विल्यमसन न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघात कर्णधार म्हणून परतला आहे. विशेष म्हणजे, 2015 नंतर प्रथमच न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे.

दरम्यान, न्यूझीलंडने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने (New Zealand) टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अनुभवी खेळाडूंना परत बोलावले आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) व्यतिरिक्त, टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट हे देखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग असतील.

Kane Williamson
IND vs WI: वेस्ट इंडिज विरूध्द मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

ब्लॅककॅप्सचे मुख्य निवडकर्ते म्हणाले, “टी-20 विश्वचषक आता फार दूर नाही. विश्वचषकासाठी संघ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आम्ही आमची टीम तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहे.''

दुसरीकडे, न्यूझीलंडचे स्टार खेळाडू केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ड, टिम साऊथी आणि कॉनवे गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकापासून मर्यादित षटकांचा भाग नव्हते. या दिग्गज खेळाडूंसाठी वेस्ट इंडिजचा दौराही सोपा असणार नाही कारण न्यूझीलंडला केवळ 11 दिवसांत 6 सामने खेळायचे आहेत. यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

Kane Williamson
Ind Vs Wi 2nd ODI Playing 11: वेस्ट इंडिज ने का बदलला कर्णधार?

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ड, ब्रेसवॉल, कॉनवे, ल्यूकी फर्ग्युसन, मार्टन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, मिशेल, निशम, फिलिप्स, सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com