कपिल देव पुन्हा एकदा गोल्फ कोर्सवर..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीस सामोरे गेलेले कपिल देव यांनी गोल्फ खेळण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या विश्‍वकरंडक विजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी क्रिकेटला निरोप घेतल्यानंतर गोल्फमध्ये कसब पणास लावले आहे.

नवी दिल्ली :  काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीस सामोरे गेलेले कपिल देव यांनी गोल्फ खेळण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या विश्‍वकरंडक विजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी क्रिकेटला निरोप घेतल्यानंतर गोल्फमध्ये कसब पणास लावले आहे. डॉक्‍टरांनी परवानगी दिल्यावर लगेच आपण गोल्फ खेळण्यास सुरुवात करणार, असे कपिलदेव यांनी रुग्णालयातून परतल्यानंतर सांगितले होते.

गोल्फ कोर्सवर परतल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. गोल्फ खेळण्याचा आनंद मित्रांसह पुरेपूर घेतला. आता पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे, असे ट्‌विट कपिल यांनी केले. गेल्या महिन्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. काही दिवसांनी घरी परतल्यानंतर कपिल देव यांनी क्रिकेटचे विश्‍लेषणही करण्यास सुरुवात केली होती. आता ते गोल्फ कोर्सवरही परतले आहेत.
 

संबंधित बातम्या