IPL 2021: अश्विन आणि मॉर्गन यांच्यातील बाचाबाचीचे कारण कार्तिकने केले स्पष्ट

19 व्या षटकामध्ये कोलकाताच्या खेळाडूने फेकलेला चेंडू पंतला लागला त्याच दरम्यान दिल्लीचा कर्णधार अश्विनसोबत (Ravichandran Ashwin) धावा घेण्यासाठी धावला.
Kolkata Knight Riders & Delhi Capitals
Kolkata Knight Riders & Delhi CapitalsDainik Gomantak

आयपीएल 2021 (IPL 2021) ची कोरोनाच्या पाश्वभूमीवर रंगतदार सुरुवात झाली. दरम्यान खेळाडूंमधील वाद हे काही क्रिकेटचाहत्यांसाठी नवे नाहीत. यातच आता मंगळवारी दोन सामने पार पडले. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात झाला. कोलकाताने हा सामना जिंकत दिल्लीला आघाडी घेण्यापासून रोखले आहे. परंतु या सामन्यातील एका घटनेने क्रिकेट चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. सामना चालू असतानाच दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) मध्येच मैदानावर भिडले. अश्विन फलंदाजी करत असताना दोघांमध्ये वाद झाला. 19 व्या षटकामध्ये कोलकाताच्या खेळाडूने फेकलेला चेंडू पंतला लागला त्याच दरम्यान दिल्लीचा कर्णधार अश्विनसोबत धावा घेण्यासाठी धावला.

Kolkata Knight Riders & Delhi Capitals
IPL 2021: हार्दिकमुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

दरम्यान, अश्विन आणि मॉर्गन यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकने दोघांमध्ये निर्माण झालेला वाद मिटविण्याचे काम केले. मात्र वाद होण्याचे नेमके कारण कार्तिकने सांगितले. सामन्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेदरम्यान कार्तिक म्हणाला, “मला माहित होते की, राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला, दरम्यान तो थ्रो पंतला लागला. यानंतर अश्विनने धावण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर मॉर्गन आणि अश्विन यांच्यात झालेला वाद प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

आउट झाल्यानंतर भिडले

यानंतर, जेव्हा अश्विन आऊट झाला, तेव्हा तो पुन्हा कोलकाताचे गोलंदाज टीम साऊदी आणि मॉर्गन यांच्याशी वाद करताना दिसला. साउदीने शेवटच्या षटकात अश्विनला बाद केले. अश्‍विनने खेळलेला चेंडू सौदीने कमी वेगाने टाकला होता. अश्विनने क्रिझच्या बाहेर येऊन हा चेंडू पूल केला परंतु डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या नितीश राणाने अश्विनचा झेल टिपला. या दरम्यान, जेव्हा अश्विन धाव काढण्यासाठी क्रीज ओलांडत होता, तेव्हाच सौदी त्याला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर अश्विनचा संताप अनावर झाला. आणि त्याने सौदीला तात्काळ उत्तर दिले. दरम्यान, कोलकाताचा कर्णधार मॉर्गनही तेथे आला आणि पुन्हा एकदा अश्विनशी भिडला. त्यानंतर मात्र कार्तिक, पंत आणि पंचांनी यामध्ये हस्तक्षेप करत हा सगळा वाद मिटवला.

Kolkata Knight Riders & Delhi Capitals
IPL 2021: CSK ला मिळाला दुसरा धोनी, रॉबिन उथप्पाने सांगितले 'या' खेळाडूचे नाव

नेमका सामना असा राहिला

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. परंतु कोलकात्याने दिल्लीला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. दिल्लीने 20 षटकांत नऊ विकेट गमावून केवळ 127 धावा केल्या. कोलकाताने हे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण केले. त्यासाठी नितीश राणाने नाबाद 36 धावा केल्या. सुनील नरेन शेवटच्या सामन्यात आला आणि त्याने 10 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com