"रवी शास्त्रींच्या सुंदर आठवणींचा ठेवा आत्मचरित्रातून उलगडणार"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

भरतीय क्रिकेट विश्वातील सर्वाधिक यशस्वी संघ प्रशिक्षक रवी शास्त्री आपला क्रिकेट क्षेत्रातील 36 वर्षांचा  यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा आत्मचरित्रातून मांडणार आहेत.

मुंबई:भरतीय क्रिकेट विश्वातील सर्वाधिक यशस्वी संघ प्रशिक्षक रवी शास्त्री आपला क्रिकेट क्षेत्रातील 36 वर्षांचा  यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा आत्मचरित्रातून मांडणार आहेत.ज्या क्रिकेटपटूंनी तसेच क्रिकेट व्यतिरिक्तही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांच्या बद्दल कृतज्ञता  आपल्या आत्मचरित्रातून व्यक्त करणार आहेत.क्रिकेट विश्वात प्रवेश केल्यापासून आलेल्या चांगले वाईट अनुभव यानिमित्ताने उलगडणार आहेत.येत्या उन्हाळ्यात या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असल्याचं सांगण्यात येत आहै.

टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री 36 वर्षापूर्वी बडोद्याविरुध्द रणजी क्रिकेट खेळताना क्रिकेट जगतातील चाहत्यांना पहिल्यांदा माहिती झाले होते.रवी शास्त्री यांनी तिलक राज या गोलंदाजाच्या षटकात 6 षटकार मारुन नवा विक्रम रचला होता.शास्त्रींच्या आत्मचरित्रासाठी जेष्ठ क्रिडा पत्रकार अयाज मेमन करणार आहेत.तसेच पुस्तकातील चित्रे हार्पर कॉलीन्सचे चित्रकार शिव राव चितारणार आहेत.आपल्या यशस्वी कारकिर्दीचा अनुभव पुस्तकबध्द होत आहे, हा माझासाठी सुंदर असा अनुभव आहे.असा विश्वास टीम इंडियाचे यशस्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या