Cricket Tournament:'केरळ'च्या विजयाने 'गोव्या'च्या मर्यादा उघड

केरळचा 5 विकेट, 71 चेंडू राखून सहज विजय
Cricket
CricketDainik Gomantak

पणजी: गोवा क्रिकेट संघाच्या गोलंदाजीतील मर्यादा मंगळवारी पुन्हा एकदा उघड झाल्या, त्यामुळे त्यांना विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. केरळने त्यांच्यावर 5 विकेट व तब्बल 71 चेंडू राखून सहज मात केली.

(Kerala defeated Goa in the Vijay Hazare Trophy ODI Cricket Tournament)

बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत फॉर्ममधील दर्शन मिसाळ (69) याच्या अर्धशतकामुळे गोव्याने 8 बाद 241 धावा केल्या. त्यानंतर केरळने विजयी लक्ष्य 5 गडी गमावून 38.1 षटकांतच गाठले. जबदरस्त फलंदाजी करणारा सलामीचा रोहन कुन्नुम्मल याने आक्रमक शतक केले. त्याने नाबाद अर्धशतकवीर कर्णधार सचिन बेबी याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.

रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीतील सहा लढतीत चार शतके ठोकणाऱ्या 24 वर्षीय रोहन याने 12 व्या लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रथमच शतक ठोकले. त्याने 101 चेंडूंत 17 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 134 धावा केल्या. त्याने वत्सल याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केल्यानंतर कर्णधार सचिन बेबी याच्यासमवेत गोव्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. सचिन 51 धावांवर नाबाद राहिला. त्याने 54 चेंडूंत खेळीत 3 चौकार व 1 षटकार मारला.

Cricket
Kieron Pollard: धडाकेबाज बॅट्समन किएरॉन पोलार्डची IPL मधून निवृत्ती

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर डावखुरा दर्शन मिसाळ व दीपराज गावकर (32) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 83 धावांच्या भागीदारीमुळे गोव्याला थोडीफार आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.

बिहारविरुद्ध नाबाद 107 धावा केलेल्या दर्शनने मंगळवारी 69 धावा केल्या. त्याने 87 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार मारले. त्याअगोदर, स्नेहल कवठणकर (14) व एकनाथ केरकर (22) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली होती. गोव्याचे आता तीन लढतीनंतर सहा गुण कायम राहिले. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (ता. 17) तमिळनाडूविरुद्ध होईल.

Cricket
T20 कर्णधार बनण्याच्या शर्यतीत हे 3 खेळाडू, जाणून घ्या संपत्तीत कोण आहे आघाडीवर?

संक्षिप्त धावफलक

गोवा : 50 षटकांत 8 बाद 241 (स्नेहल कवठणकर 14, वैभव गोवेकर 4, एकनाथ केरकर 22, सिद्धेश लाड 12, सुयश प्रभुदेसाई 34, दर्शन मिसाळ 69, दीपराज गावकर 32, मोहित रेडकर नाबाद 23, लक्षय गर्ग 3, अर्जुन तेंडुलकर नाबाद 2, एन. पी. बासिल 2-48, के. एम. आसिफ 1-49, अखिल स्कारिया 3-34, विनूप मनोहरन 1-29) पराभूत वि. केरळ : 38.1 षटकांत 5 बाद 242 (पी. राहुल 14, रोहन कुन्नुम्मल 134, वत्सल 22, सचिन बेबी नाबाद 51, अर्जुन तेंडुलकर 9-0-57-0, लक्षय गर्ग 6-0-39-0, फेलिक्स आलेमाव 4-0-37-1, दीपराज गावकर 2-0-9-0, दर्शन मिसाळ 7-0-37-1, मोहित रेडकर 5-0-42-0, सिद्धेश लाड 5.1-0-19-3).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com