हिंदीमध्ये ट्विटकरत 'केविन पीटरसनने' केली चिंता व्यक्त

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीलचे उर्वरित सर्व सामने रद्द करण्यात आले होते.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक केविन पीटरसन (Kevin Pitarsen) अलीकडच्या काळात आपल्या ट्विटरवर हिंदीमध्ये ट्विट करुन चाहत्यांची मनं जिंकत आहे. आता कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे आयपीएल (IPL 2021) पुढे ढकलण्यात आली आहे. पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट करून आपला मुद्दा भारतीयांसमोर ठेवला आहे. पीटरसन सध्या मालदीवमध्ये आहे आणि तेथून इंग्लंडला (England) रवाना होईल. हिंदीमध्ये ट्विट करताना केव्हिनने भारतीय लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. पीटरसनने हिंदीमध्ये केलेले हे ट्विट चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहतेही त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. (Kevin Peterson tweeted in Hindi expressing concern)

Olympics: भारतीय संघापासून जपानवासीयांना धोका

केविन पीटरसनने ट्विट केले की, 'मी कदाचित भारत सोडला असेल, परंतु तरीही मी अशा एका देशाचा विचार करीत आहे ज्याने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे, कृपया लोक सुरक्षित रहावे, ही वेळ निघून जाईल परंतु आपण सावध रहावे. पीटरसनच्या ट्विटवर चाहतेही आपली प्रतिक्रिया देत आहेत. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर परदेशी खेळाडू मालदीपला गेले आहेत. बरेच परदेशी खेळाडू तेथून मायदेशी परतत आहेत.

युवा कुस्तीपटूच्या खून प्रकरणात ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार!

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडू अद्याप आपल्या देशात परतलेले नाहीत. वस्तुतः ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या सर्व विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने यावर 15 मे पर्यंत बंदी घातली आहे. हेच कारण आहे की ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीपला गेले आहेत. मालदीपमध्ये काही दिवस राहिल्यानंतर सर्व कांगारू खेळाडू आपल्या देशात परत येतील. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये अजूनही 31 सामने बाकी आहेत. उर्वरित सामने आयोजित करणे भारतात शक्य नाही, असे बीसीसीआयचे सौरव गांगुली यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बीसीसीआय (BCCI) यासाठी आणखी एक पर्याय शोधत आहे.

दरम्यान, आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीलचे उर्वरित सर्व सामने रद्द करण्यात आले होते. स्पर्धा सुरु असतानाच काही खेळाडू आपल्या देशात परतले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता बीसीसीआयने स्पर्धा सत्यजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता उर्वरित सामने घेण्यासाठी भारतीय बोर्डला अनेक देश आमंत्रण देत आहेत. आगामी काळात आयपीएल कुठे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

संबंधित बातम्या