Kevin Pietersen Tweet: पीटरसनने विराटला दिला RCB सोडून 'या' टीममध्ये जाण्याचा सल्ला! फॅन्सने केला हल्लाबोल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे 16व्यांदा IPL जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर विराटला पीटरसनने अनोखा सल्ला दिला आहे.
Kevin Pietersen Virat Kohli
Kevin Pietersen Virat KohliDainik Gomantak

Kevin Pietersen advised Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना गुजरात टायटन्स संघाने 6 विकेट्सने जिंकला.

दरम्यान, या सामन्यात बेंगलोरला पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांचे आयपीएल 2023 मधील आव्हानही संपुष्टात आले. तसेच सलग सोळाव्यांदा बेंगलोरचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

विशेष म्हणजे रविवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरकडून विराटने शतकी खेळीही केली होती. यासह त्याने आयपीएमध्ये सर्वाधिक 7 शतके करण्याचा विक्रमही केला होता. पण असे असले तरी त्याच्या शतकाला विजयाची किनार लाभली नाही.

त्यातच या सामन्यानंतर केविन पीटरसनने एक ट्वीट केले आहे, ज्यात त्याने विराटला एक पर्याय सुचवला आहे. मात्र, सोशल मीडिया युजर्सने पीटरसनवरलाच त्याच्या सल्ल्याबद्दल सुनावले आहे.

Kevin Pietersen Virat Kohli
IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

पीटरसनने ट्वीट केले आहे की 'विराटने राजधानी असलेल्या शहराकडे जाण्याची आता वेळ आली आहे.' या ट्वीटमधून पीटरसनने विराटला दिल्लीकडून खेळण्याचा सल्ला दिला असल्याचा कयास अनेक चाहत्यांनी लावला आहे. त्याचमुळे अनेकांकडून पीटरसनला ट्रोल करण्यात येत आहे.

पीटरसनने केलेल्या ट्वीटवर एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की 'निष्ठा विकत घेतली जाऊ शकत नाही, केपी.' तसेच आणखी एका युजरने कमेंट केली आहे की 'हे कधीही होणार नाही. फक्त ट्रॉफीसाठी आरसीबी सोडणारा कोहली कधीच असू शकत नाही.' काही युजर्सने मीमही शेअर करत पीटरसनच्या सल्ल्यावर नकार दिला आहे. एका युजरने ट्वीट केलंय की 'स्वप्न पाहात राहा. किंग कधीच बंगळुरू सोडणार नाही.'

Kevin Pietersen Virat Kohli
Virat Kohli Century: किंग कोहलीचा नादच खुळा! सलग दुसरी सेंच्युरी करत IPL मध्ये रचला इतिहास

गेले 16 हंगाम विराट बेंगलोरमध्ये

विराट गेल्या 16 आयपीएल हंगामापासून म्हणजेच 2008 सालापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे तो एकमेव असा खेळाडू आहे. जो तब्बल 16 आयपीएल हंगाम एकाच संघाकडून खेळत आहे.

त्याने आयपीएलमध्ये बेंगलोरकडून खेळताना 237 सामन्यांमध्ये 37.25 च्या सरासरीने 7 शतकांसह 7263 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 7 शतकांचा आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com