"विराट कोहलीच्या कॅप्टन्सीबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

चेन्नई कसोटीत इंग्लंड कडून इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या दोन माजी कर्णधारांनी भारतीय संघाला धारेवर धरले आहे. मायकेल वॉन आणि केविन पीटरसन हे भारताच्या जखमांवर मीठ चोळतांना दिसत आहेत.

चेन्नई: चेन्नई कसोटीत इंग्लंड कडून इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या दोन माजी कर्णधारांनी भारतीय संघाला धारेवर धरले आहे. मायकेल वॉन आणि केविन पीटरसन हे भारताच्या जखमांवर मीठ चोळतांना दिसत आहेत. विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही. ही अनावश्यक चर्चा आहे. असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसने व्यक्त केले आहे.

“भारतीय संघ कर्णधारविराट कोहलिच्या नेतृत्वाखाली सलग चार कसोटी सामने हरला आहे. भारतीय क्रिकेट संघात कसोटी कर्णधारपदावरुन होणारी चर्चा टाळणे अशक्य आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियातील भारताच्या मालिका विजयाचे नेतृत्व केले होते” असे इंग्लडच्या माजी कर्णधार पीटरसनने ‘बेटवे’साठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

विराट कोहली आताच पितृत्वासाठी घेतलेली रजा संपवून पुन्हा एकदा नियमित भारतीय संघाचा कर्णधार म्हणून परतला आहे. मात्र इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातच भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे  “प्रत्येक वृत्त वाहिन्यांवर, प्रत्येक रेडिओ स्टेशन सोशल मीडिया भारतीय क्रिकेट संघात  काय घडलं? या विषयावर सखोल चर्चा करत आहे. देशाचे कर्णधारपद भूषवणे हे कठिणच असते. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन पुन्हा गोंधळाची स्थिती नको आहे. भारतीय संघाचा विराट कोहली आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, तेव्हा त्याने विचलित होण्याची गरज नाही” असे पीटरसनने त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

“पहिल्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड नव्हता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर दबाव असणार आहे. आर्चरला दुखापती झाल्यामुळे संघाबाहेर गेला आहे. उद्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्रॉड टीममध्ये असणार आहे” असे पीटरसनने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

 

संबंधित बातम्या