Khashaba Jadhav Birth Anniversary: 'ऑलिम्पिक'साठी ठेवलं होतं घर गहाण!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

सध्याच्या घडीला छोट्याशा खेड्यातून आलेले अनेकजण संपूर्ण जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. बऱ्याच वेळेला लहान गाव किंवा वस्तीत राहणाऱ्यांमध्ये असणारी प्रतिभा ही पुढे न येता ती तिथेच राहते. पण खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय इतिहासातील असेच एक नाव आहे, ज्यांनी आपली प्रतिभा ओळखून नुकतेच  स्वातंत्र्य झालेल्या आपल्या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.

सध्याच्या घडीला छोट्याशा खेड्यातून आलेले अनेकजण संपूर्ण जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. बऱ्याच वेळेला लहान गाव किंवा वस्तीत राहणाऱ्यांमध्ये असणारी प्रतिभा ही पुढे न येता ती तिथेच राहते. पण खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय इतिहासातील असेच एक नाव आहे, ज्यांनी आपली प्रतिभा ओळखून नुकतेच  स्वातंत्र्य झालेल्या आपल्या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एका लहानशा मातीतून पुढे येत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडली ते म्हणजे कुस्तीपटू खाशाबा जाधव.   

महाराष्ट्रातील गोलेश्वर या छोट्याशा गावात 15 जानेवारी 1926 मध्ये जन्मलेल्या खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवून दिले होते. खाशाबा जाधव यांना पॉकेट डायनॅमो देखील म्हटले जायचे. कारण त्यांची उंची जास्त नव्हती, परंतु त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. आणि त्यामुळेच खाशाबा जाधव यांनी केवळ आपलेच नाही तर भारताचे नाव जगाच्या पटलावर कोरले. कुस्तीमध्ये देशासाठी ऑलिम्पिक जिंकणे हे त्यांचे स्वप्न होते. पण हे एका प्रयत्नात साध्य झाले नाही. 

भारतीय सैन्य दिन 2021: मॅचस्टिकपासून साकारला भारतीय लष्करी सैन्याचा रणगाडा

खाशाबा जाधव यांनी 1948 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी खाशाबा जाधव यांना मदत केली आणि लंडनला पाठविले. परंतु यावेळेस त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. व त्यानंतर पुढील चार वर्षांनी फिनलँडच्या भूमीवर 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी इतिहास रचला. 

1952 च्या ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी देखील खाशाबा जाधव यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून थोडी मदत खाशाबा जाधव यांना मिळाली. पण ती अपुरी असल्यामुळे खाशाबा जाधव यांनी कुटुंबीयांशी सल्लामसलत केल्यानंतर आपले राहते घर गहाण ठेवले होते. व यानंतर त्यांनी ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडलवर आपले नाव कोरले होते. खाशाबा जाधव यांना या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले असते. परंतु या स्पर्धेत कुस्तीसाठी मॅट वापरण्यात आले होते. व या मॅटची सवय खाशाबा जाधव यांनी फारशी नव्हती. ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर खाशाबा जाधव यांचे देशात जंगी स्वागत करण्यात आले होते.           

संबंधित बातम्या