Table Tennis: खुशालला दुहेरी किताबाची संधी

राज्य टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धेत दोन गटात अंतिम फेरी
Table Tennis: खुशालला दुहेरी किताबाची संधी
खुशाल नाईक (डावीकडे) व रिशान शेखDainik Gomantak

पणजी, ता. १ (क्रीडा प्रतिनिधी) ः राज्य मानांकन टेबल टेनिस (Table Tennis) स्पर्धेत दोन गटात अंतिम फेरी गाठल्यामुळे खुशाल नाईक (Khushal Naik) याला दुहेरी किताबाची संधी आहे. त्याने सबज्युनियर (१५ वर्षांखालील) व कॅडेट (१३ वर्षांखालील) मुलांच्या एकेरीत शुक्रवारी अंतिम फेरी गाठली.

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियम (Mapusa - Peddem Indoor Stadium) मध्ये सुरू आहे. सबज्युनियर गटात खुशालसमोर ॲरोन फारियास याचे, तर कॅडेट एकेरीत रिशान शेख याचे आव्हान असेल. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित चंदन कारे व ध्रुव कामत यांच्यात लढत होईल. ध्रुव याने उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित चिन्मय बाक्रे याला पराभवाचा धक्का दिला.

खुशाल नाईक (डावीकडे) व रिशान शेख
Goa: धेंपो क्लबचा विजयाने क्रीडा मोसमाच्या आरंभ

उपांत्य फेरी निकाल

११ वर्षांखालील मुलगे ः चंदन कारे वि. वि. ओझिल कोर्दो ३-० (११-६, ११-७, ११-३), ध्रुव कामत वि. वि. चिन्मय बाक्रे ३-० (११-६, ११-९, ११-६).

१३ वर्षांखालील मुलगे ः खुशाल नाईक वि. वि. चंदन कारे ३-० (११-६, ११-७, ११-३), रिशान शेख वि. वि. सिद्धांत पार्सेकर ३-० (११-९, ११-९, ११-३).

१५ वर्षांखालील मुलगे ः खुशाल नाईक वि. वि. पुष्कर विर्जिनकर ३-० (११-२, ११-२, ११-२), ॲरोन फारियास वि. वि. अक्षण लवंदे ३-१ (७-११, ११-७, ११-९, ११-५).

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com