किदांबी श्रीकांत दुखापतीमुळे 'थायलंड ओपन'मधून बाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पोटरीच्या स्नायूवर  ताण आल्याने  थायलंड ओपनमधून बाहेर पडत असल्याचे भारतीय शटलर किदांबी श्रीकांतने आज जाहीर केले.

थायलंड :  पोटरीच्या स्नायूवर  ताण आल्याने  थायलंड ओपनमधून बाहेर पडत असल्याचे भारतीय शटलर किदांबी श्रीकांतने आज जाहीर केले. दुसर्‍या फेरीत किदांबीला मलेशियाच्या ली झी जिया विरुद्ध लढत द्यावी  लागणार होती श्रिकांतने स्पर्धेतून माघार घेतल्याने  जियाने स्पर्धेच्या पुढील फेरीत पुढे प्रवेश केला आहे."स्नायूच्या ताणमुळे मला थायलंड ओपनमधून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे", असं श्रीकांतने ट्विट केले.

INDvsAUS : चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियावर संक्रांत,ऑस्ट्रेलियालाही दुखापतीचं ग्रहण 

श्रीकांतने बुधवारी सौरभ वर्मावर सहज विजय मिळवल्यानंतर. थायलंड ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. हा सामना त्याने २१-१२,२१-११ अशा फरकाने जिंकला. किदांबीने काही दिवसांपूर्वी थायलंड ओपन स्पर्धेच्या आयोजकांविषयी आपला संताप व्यक्त केला होता. बॅडमिंटनपटू श्रीकांत सध्या थायलंडमध्ये सुरू असलेल्या ओपन स्पर्धेसाठी बँकॉकमध्ये आहे. त्याने मंगळवारी ट्विटरवर तीन फोटो पोस्ट केले आणि आयोजकांवर नाराजी व्यक्त केली होती. ज्यामध्ये वारंवार कोरोना चाचणी करण्यात आल्याने नाकातून रक्तस्त्राव होत आसल्याचे सांगितले होते. 

INDvsAUS : बुमराह बरा झाल्यास चौथ्या कसोटीत खेळणार; टीम इंडियाच्या आशा पल्लवित 

 

 

 

संबंधित बातम्या