सुर्यकुमार यादवला खेळासाठी किरॉन पोलार्डने पुन्हा केले प्रोत्साहीत, नेमकं झालं तरी काय?

किरॉन पोलार्डने सुर्यकुमार यादवला प्रोत्साहन दिले आणि सामना जिंकण्यासाठी पुन्हा प्रेरित केले.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी रात्री पंजाब किंग्जकडून 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे तर मुंबईचा या मोसमातील हा पाचवा पराभव आहे. सलग टूर्नामेंटमध्ये पराभूत होत असलेला मुंबईचा संघ पंजाबविरुद्धच्या सामन्यात विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वगळता प्रत्येक गोलंदाजाने प्रथम फटकेबाजी करताना दिसून आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही रनआऊटवेळी सूर्यकुमार यादव मैदानावर उपस्थित होते. (Kieron Pollard encouraged Suryakumar Yadav and re inspired him to win the match)

Mumbai Indians
'RCB जोपर्यंत IPL जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही' महिला क्रिकेटप्रेमीचा फोटो व्हायरल

अर्शदीपच्या 13व्या षटकात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) लेग साइड शॉट मारला, पण चेंडू थेट मयंक अग्रवालच्या हातातच गेला. सूर्यकुमार यादवला येथे धावा घ्यायच्या नव्हत्या, पण नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उपस्थित असलेल्या टिळक वर्माने कोणतीही हाक न देता रन काढण्यासाठी धावायला सुरुवात केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंच्या समन्वयात गडबड झाली आणि टिळक वर्मा धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. हा युवा खेळाडू धावबाद होण्याआधी शानदार फलंदाजी करत होता तर त्याने 20 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावा आपल्या नावावर केल्या.

तर दुसरा धावबाद किरॉन पोलार्डचा होता. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली आहे. पोलार्ड वैभव अरोराच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने एक शॉट खेळला आणि तो धावण्यास सुरुवात केली. अचानक त्याला दिसले की तिथे उपस्थित असलेल्या ओडियन स्मिथकडे एक मिसफिल्ड आहे ज्याचा त्याला फायदा उचलायचा होता पण आणखी एका धावेच्या लोभापायी तो धावबाद झाला.

Mumbai Indians
'आमची खेळी चांगली नाही, तयारीची गरज': रोहित शर्मा

जेव्हा एक खेळाडू दुसऱ्या टोकाला दोन इतर खेळाडूंना धावबाद होताना पाहतो तेव्हा तो खूप निराश होतो आणि बहुतेक वेळा तो स्वतःला दोष देत असतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कमी होतो आणि अशीच अवस्था सूर्यकुमार यादवची झाली. पण यादरम्यान किरॉन पोलार्डने त्याला प्रोत्साहन दिले आणि सामना जिंकण्यासाठी पुन्हा प्रेरित केले.

पोलार्ड (Kieron Pollard) धावबाद झाल्यानंतर सूर्यकुमार चेहरा बाकिर करून जमिनीवर बसला, आणि त्यानंतर या कॅरेबियन खेळाडूने पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याला प्रोत्साहन दिले. पोलार्ड बाद झाला तेव्हा सूर्यकुमार 19 चेंडूत 22 धावा करत क्रीजवर खेळत होता. यानंतर सूर्यकुमारने काही अप्रतिम शॉट्स खेळले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाहीये. सूर्यकुमार 30 चेंडूत 43 धावा करून बाद झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com