IPL 2021 RCB vs CSK: कॅप्टन कूल विरुद्ध किंग कोहली रंगणार सामना

CSK vs RCB
CSK vs RCB

आयपीएल 2021 हंगामातील 19 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. त्यामुळे आजचा सामना हायस्कॉरिंगचा असू शकतो. मागील काही सामन्यात सीएसके नेहमीच आरसीबीवर भारी ठरलेला आहे. या दोघांमधील खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांत चेन्नईने बंगळुरुला 8 वेळा पराभूत केले. गुणतालिकेमध्ये (Point Table) आरसीबी अव्वल आहे, तर सीएसके नंबर 2 नंबरवरती आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात बंगळुरू संघाने या हंगामात आतापर्यंत सर्व 4 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या हंगामातील वानखेडे स्टेडियमवरती आजचा दोन्ही संघांचा शेवटचा सामना असणार आहे. (King Kohli will play against Captain Cool)

5 वेळा झाल्यात 200+ वर धावा
दरम्यान,  वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना उपयुक्त आहे. तसेच दोन्ही संघांची फलंदाजी आक्रमक आहे. या हंगामात 5 वेळा 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. यामध्ये 4 वेळा मुंबईच्या खेळपट्टीवर झाल्या आहेत. एकदा चेन्नईच्या खेळपट्टीवर बंगळुरूच्या संघाने कोलकाताविरुद्ध 204 धावा केल्या. वानखेडेच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने 220 धावा करुन कोलकाता विरुद्ध सामना जिंकला आहे. 

9 व्या विकेटपर्यंत सीएसकेची फलंदाजी 
सीएसकेच्या संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. शेवटच्या सामन्यात दोघांनी कोलकाता विरुद्ध अर्धशतक झळकावले होते, यामुळे संघाला विजय मिळाला होता. दोघांनी शतकी भागीदारी केली होती. त्यांच्याशिवाय मोईन अली, एमएस धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजासारखे फलंदाज आहेत. खालच्या फळीत सॅम करण आणि शार्दुल ठाकूर मोठे फटके मारू शकतात. म्हणजेच सीएसकेच्या संघाची  फलंदाजी 9 विकेट पर्यंत आहे.

संभाव्य संघ 
चेन्नई: ऋतूराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कप्तान/विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो/लुंगी एनगीडी, रवींद्र जडेजा, मोईन अली, सॅम कुरण, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
बेंगलोर: देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कप्तान), एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, काईल जेमीसन, केन रिचर्डसन/डॅनियल ख्रिश्चन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

संध्याकाळच्या सत्रात रंगणार दिल्ली विरुद्ध हैद्राबाद सामना 
आजच्या दिवसातील दुसरा आणि या हंगामातील 20 वा सामना दिल्ली (DC) विरुद्ध हैद्राबाद यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवरती होणार आहे. दिल्लीचा मागचा सामना मुंबई विरुद्ध झाला त्यात दिल्लीने मुंबईला हरवले होते. त्याचबरोबर, हैद्राबादने (SRH) मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला हरवत या हंगामातील पहिला विजय मिळवला होता. दोन्हीही संघ आपला मागचा सामना जिंकून मैदानावर उतरणार आहेत त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहेत. चेन्नईची खेळपट्टी गोलंदाजांची पोषक आहे. आतापर्यंत या मैदानावरील सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेले त्यामुळे या मैदानावर सामने लोस्कोअरिंग होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com