कोलकाताला पराभूत करुन पंजाबही प्लेऑफच्या शर्यतीत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

१५० धावांच्या आव्हानासमोर हुकमी कर्णधार केएल राहुल लवकर बाद झाल्यावर एका बाजू भक्कमपणे लढवणाऱ्या मनदीपला ख्रिस गेलने तेवढीत मोलाची आणि स्फोटक साथ दिली.

शारजा-दोन दिवसांपूर्वी भारतात वडिलांचे निधन झाले तरीही आयपीएलमध्ये आपल्या पंजाब संघाचा किल्ला लढवणाऱ्या मनदीप सिंगने आज निर्णायक अर्धशतकी खेळी केली त्यामुळे पंजाबने कोलकाताचा आठ विकेटने पराभव केला आणि प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले. ख्रिस गेलनेही ५१ धावांचा तडाखा दिला.

शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबने कोलकाताला १४९ धावांवर रोखले आणि हे आव्हान १८.५ षटकांत पार केले. पंजाबचे आता कोलकाताप्रमाणे प्रत्येकी १२ सामन्यानंतर १२ गुण झाले आहेत. 

१५० धावांच्या आव्हानासमोर हुकमी कर्णधार केएल राहुल लवकर बाद झाल्यावर एका बाजू भक्कमपणे लढवणाऱ्या मनदीपला ख्रिस गेलने तेवढीत मोलाची आणि स्फोटक साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १० षटकांत १०० धावांची भागीदारी केली. 

कोलकाताची खराब सुरुवात

कोलकाताची सुरुवात फारच निराशाजनक होती. मॅक्‍सवेलने पहिल्याच षटकांत नितिश राणाला बाद केले त्यानंत महम्मद शमीने कोलकाताची दाणादाण उडवली. राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक यांना तीन चेंडूंत बाद केले त्यावेळी त्यांची अवस्था ३ बाद १० अशी झाली होती
शुभमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी डाव सावरण्याबरोबर वेगही पकडला होता त्यामुळे कोलकाताने नऊ धावांच्या सरासरीने वाटचाल केली. त्यानंतर मॉर्नगसह सुनील नारायण, कमिंस बाद झाल्यामुळे त्यांची अडचण झाली, परंतु लॉकी फर्ग्युसनने १३ चेंडूत २४ धावांचा तडाखा दिला. 
 

संबंधित बातम्या