यंदाच्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब दिसणार नव्या रुपात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

आयपीएलच्या नव्या हंगामात पंजाबची टीम किंग्स इलेव्हन पंजाब या नावाच्या जागी ‘पंजाब किंग्ज’ या नावाने मैदानात उतरणार आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीगच्या 14 व्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब टीमच्या नावात बदल करण्यात आला आहे. बुधवारी टीमने नवा लोगो लॉंन्च केला आहे. टीमचा लोगो सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे, आणि लोगोला क्रिकेटप्रेमींची चांगलीच पसंती मिळत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने यापूर्वीच घोषणा केली होती की, टीम नव्या लोगो आणि नावासंह आयपीएलच्या हंगामात खेळण्यासाठी उतरणार आहे.

आयपीएलच्या नव्या हंगामात पंजाबची टीम किंग्स इलेव्हन पंजाब या नावाच्या जागी ‘पंजाब किंग्ज’ या नावाने मैदानात उतरेल आहे. सोशल मिडीयीवरुन पंजाबच्या टिमचा नवा लोगो प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा लोगो पंजाब  टीम आणि इंडियन प्रिमीयर लिगच्या आकाउंटवरुन पोस्ट करण्यात आलेला नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ट्विटर आकाउंटवरुन बुधवारी ट्विट करण्य़ात आले आहे, ज्यामध्ये ‘थैंक्यू ट्विटर आणि साड्डे फैन’ असं म्हटलं आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब  टीमचा अशा  तीन टीममध्ये  समावेश  करण्यात  येतो की, ज्या टीमने आतापर्यंत आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. रॉयल चॅलंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या टीम सुध्दा हा किताब जिंकू शकलेल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स टीमने यापूर्वी आपला लोगो बदलेला आहे. आता पंजाब टीमसुध्दा आपल्या नव्या लोगोसंह या 14 व्या आयपीएलच्या हंगामात खेळण्यासाठी उतरणार आहे. तर दुसरीकडे पंजाब टीमच्या चाहत्य़ांकडून ट्विटरवर ‘पंजाब किंग्स’ चा नवीन लोगो ट्वीट केला जात आहे.

    

संबंधित बातम्या