चित्तथरारक सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबची मुंबईवर मात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेला हा सामना आधी टाय झाला. नंतर झालेली सुपर ओव्हर देखील टाय झाली. मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईविरोधात १२ धावांचा पाठलाग पूर्ण करत सामना जिंकला.

दुबई-  मुंबई इंडियन्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई येथे पार पडलेल्या अभूतपूर्व सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा २ चेंडू राखत पराभव केला. मयंक अग्रवाल व ख्रिस गेलने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने दिलेल्या १२ धावांचे आव्हान पूर्ण करत किंग्स इलेव्हन पंजाबला विजय मिळवून दिला. 

मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेला हा सामना आधी टाय झाला. नंतर झालेली सुपर ओव्हर देखील टाय झाली. मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईविरोधात १२ धावांचा पाठलाग पूर्ण करत सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सतर्फे हार्दिक पांड्या व केरॉन पोलार्ड यांनी दूसऱ्या सुपरओव्हरसध्ये फलंदाजी केली. तर, किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी केली. त्याआधी, मुंबईसाठी पहिली सुपर ओव्हर क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळली. पंजाबने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 5 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबईनेदेखील 5 धावा करत सुपर ओव्हर बरोबरीत सोडवली. किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे मोहम्मद शमीने गोलंदाजी केली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये सहभागी झालेले फलंदाज आणि गोलंदाज दुसर्‍या सुपर ओव्हरमध्ये सहभागी होऊ शकत नाही असा नियम आहे.

त्याआधी मुंबई इंडियन्सने विजयासाठी १७६ धावांचे आव्हान दिले होते, ते पूर्ण करत किंग्स इलेव्हन पंजाबने सामना बरोबरीत सोडवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सतर्फे क्विंटन डी कॉक ने सर्वाधिक ५३ तर, किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे के एल राहुलने सर्वाधिक  ६६ धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सतर्फे जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स पटकावल्या.

संबंधित बातम्या