IPL 2022: केकेआरने माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकाला दिली मोठी जबाबदारी

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
IPL 2022: केकेआरने माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकाला दिली मोठी जबाबदारी
Bharat ArunTwitter/ ANI

कोलकाता नाईट रायडर्सने भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2021 (IPL 2022) च्या उपविजेत्या संघाने नवीन हंगामापूर्वी मोठा बदल केला असून त्याची माहिती चाहत्यांशी शेअर केली. शुक्रवारी केकेआरच्या (Kolkata Knight Riders) अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आणि भरत यांचे संघात स्वागत करण्यात आले.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू भरत अरुण (Bharat Arun) यांनी भारतासाठी सहा आंतरराष्ट्रीय सामने (Two Tests and four ODIs) खेळले आहेत. 59 वर्षीय अरुण जुलै 2014 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियात (Team India) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी वर्षभर सेवा केली. यानंतर, 2017 मध्ये त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्यात आले आणि गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघासाठी सेवा दिली.

Bharat Arun
IPL 2022 मध्ये 6 वर्षांनंतर पुनरागमन करणार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज

भरत अरुण यांनी तामिळनाडूमधून (Tamil Nadu) आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक बनले. येथून त्यांना अंडर-19 संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आणि त्यांच्या देखरेखीखाली संघाने 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला. भरत अरुण यांना आयपीएलचा चांगला अनुभव आहे. ते 2015 ते 2017 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com