T20 World Cup 2021: KL राहुलचे विक्रमी अर्धशतक पाहून गर्लफ्रेंड अथिया ‘घायल’

शमी-जडेजाने 3-3 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, पण केएल राहुलने (KL Rahul) टीम इंडियाच्या नेट रन रेटला सावरले.
KL Rahul & Athiya Shetty
KL Rahul & Athiya ShettyDainik Gomantak

T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने (Team India) पुढचे दोन सामने अशा प्रकारे जिंकले की, सर्वांचे लक्ष लागून राहिले. अफगाणिस्तानला 66 धावांनी पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला स्कॉटलंडवर (Scotland) मोठा विजय आवश्यक होता आणि असेच काहीसे शुक्रवारी पाहायला मिळाले. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम स्कॉटलंडला 85 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर अवघ्या 39 चेंडूत हे लक्ष्य गाठले. शमी-जडेजाने 3-3 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, परंतु केएल राहुलने (KL Rahul) टीम इंडियाच्या नेट रन रेटला सावरले.

केएल राहुलने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावत टीम इंडियाला 6.3 षटकात 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. KL राहुलने 18 चेंडूत अर्धशतक ठोकून T20 विश्वचषक 2021 मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. केएल राहुलने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 263.16 होता. केएल राहुलची ही खेळी सर्व चाहत्यांबरोबर गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) देखील एन्जॉय केली.

KL Rahul & Athiya Shetty
IND VS SCO: जसप्रीत बुमराह बनला भारताचा नंबर 1 'विकेट वीर', विश्वविक्रमही मोडला

केएल राहुल केले अथिया शेट्टीला 'घायल'

केएल राहुलच्या अर्धशतकानंतर अभिनेत्री अथिया शेट्टीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. केएल राहुलने अर्धशतक पूर्ण करताच अथिया शेट्टी (Athiya Shetty) मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवताना दिसली. केएल राहुलची ही खेळी अथिया शेट्टीसाठी खूप खास असेल कारण आज तिचा वाढदिवस आहे.

केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकले. टीम इंडियाच्या मोठ्या विजयानंतर गर्लफ्रेंड अथिया शेट्टीला देखील त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी मिळून सोशल मिडियावर एक फोटो देखील पोस्ट केला, ज्याचे कॅप्शन खूप खास होते. केएल राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले की - माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा. (Heart emoji) राहुलने प्रथमच सार्वजनिक मंचावर कबूल केले आहे की, अथिया शेट्टीवर त्याचे प्रेम आहे.

KL Rahul & Athiya Shetty
IND VS SCO: जसप्रीत बुमराह बनला भारताचा नंबर 1 'विकेट वीर', विश्वविक्रमही मोडला

T20 विश्वचषकातील तिसरे जलद अर्धशतक

केएल राहुल वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वात वेगवान अर्धशतक युवराज सिंगच्या नावावर आहे, ज्याने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूत ही कामगिरी केली होती. 2014 मध्ये स्टीफन मायबर्गने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल आणि केएल राहुल यांनी 18-18 चेंडूत अर्धशतकं झळकावली आहेत. या क्रिकेटपटूचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. राहुलने अफगाणिस्तानविरुद्धही 69 धावांची इनिंग खेळली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com