IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीच टीम इंडियाची Playing 11लीक! केएल राहुलचा मोठा खुलासा

India vs Australia: कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (VCA स्टेडियम) येथे खेळवला जाणार आहे.
KL Rahul
KL Rahul Dainik Gomantak

India vs Australia Probable Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (VCA स्टेडियम) येथे खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने ही मालिका सुरु होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि संघाच्या प्लेइंग 11 बद्दल मोठे वक्तव्य केले. केएलने सांगितले की, पहिल्या सामन्यात टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरु शकते.

मधल्या फळीत फलंदाजी करावी लागणार

केएल राहुल (KL Rahul) आणि शुभमन गिल सध्या कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणारे मोठे दावेदार आहेत. अशा स्थितीत फलंदाजीच्या क्रमावर प्रश्न विचारला असता केएल राहुल म्हणाला की, 'पाहा, जर संघ व्यवस्थापनाला मी मधल्या फळीत फलंदाजी करावी असे वाटत असेल तर मला कोणतीही अडचण नाही, मी तसे करण्यास पूर्णपणे तयार आहे.'

केएल राहुलच्या या उत्तरावरुन हे स्पष्ट झाले आहे की, या मालिकेत टीम इंडियाही नव्या सलामीच्या जोडीसोबत मैदानात उतरु शकते.

KL Rahul
IND vs AUS: 'हे' खेळाडू गाजवणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, नावावर करणार मोठे रेकॉर्ड

त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये अनेक फिरकीपटूंचा समावेश असेल

भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरल्या आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टीही फिरकीपटूंना खूप मदत करेल, असे मानले जात आहे.

अशा परिस्थितीत, केएल राहुल टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग 11 बद्दल म्हणाला की, 'सध्या आम्ही प्लेइंग इलेव्हन कसे असेल हे ठरवलेले नाही. अजूनही काही जागा भरणे बाकी आहे. नागपूर कसोटीत तीन फिरकीपटूंसोबत जाण्याचा कोणताही लोभ नाही. टीम इंडियात पहिल्या दोन सामन्यांसाठी आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांचा फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे.'

KL Rahul
IND vs AUS: रोहित-विराटची गळाभेट अन् टीम इंडियाचा नेटमध्ये जोरदार सराव, कसोटीच्या तयारीचा पाहा Video

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com